मोहम्मद सिराज कसोटी रँकिंगमध्ये कितव्या क्रमांकावर? पाहा टॉप 10 गोलंदाजांची यादी

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध ‘ओव्हल’मध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटीत मोहम्मद सिराजने अप्रतिम गोलंदाजी करत भारताला 6 धावांनी थरारक विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने मालिका 2-2 ने बरोबरीत आणली. सिराजने या कसोटीत एकूण 9 विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात पाच विकेट्सची कमाल केली.

या कामगिरीचा फायदा त्याला आयसीसी रँकिंगमध्ये नक्कीच होणार आहे. मात्र सध्या तो टॉप 10 तर सोडाच, टॉप 20 गोलंदाजांमध्ये देखील नाही.

सिराजने या इंग्लंड दौऱ्यातील सर्व 5 कसोट्या खेळल्या, ज्यात त्याने 1100 पेक्षा जास्त चेंडू टाकत 23 विकेट्स घेतल्या. आयसीसी पुरुष कसोटी रँकिंग आता 6 ऑगस्ट रोजी अपडेट होणार असून, त्यात सिराजला सध्याच्या स्थानापेक्षा वर जाण्याची मोठी संधी आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जगातील नंबर-1 कसोटी गोलंदाज आहे. त्याच्या नावावर 898 गुण आहेत. टॉप 10 कसोटी गोलंदाजांमध्ये बुमराह एकमेव भारतीय आहे. त्याच्यानंतर दुसरा भारतीय खेळाडू रवींद्र जडेजा 14व्या क्रमांकावर आहे.

आयसीसी टॉप 10 कसोटी गोलंदाजांची यादी-

जसप्रीत बुमराह – भारत
कागिसो रबाडा – दक्षिण आफ्रिका
पॅट कमिन्स – ऑस्ट्रेलिया
जोश हेझलवुड – ऑस्ट्रेलिया
नोमन अली – पाकिस्तान
स्कॉट बोलंड – ऑस्ट्रेलिया
मॅट हेनरी – न्यूझीलंड
नॅथन लायन – ऑस्ट्रेलिया
मार्को यान्सेन – दक्षिण आफ्रिका
मिशेल स्टारक – ऑस्ट्रेलिया

इंग्लंडविरुद्ध 5व्या कसोटीत 9 विकेट्स घेत प्लेयर ऑफ द मॅच ठरलेला सिराज सध्या टॉप 20 मध्येही नाही. तो सध्या 27व्या स्थानावर असून त्याच्या नावावर 605 गुण आहेत. मागच्या वेळेस रँकिंग अपडेट झाल्यावर त्याला पाच स्थानांचा तोटा झाला होता. पण यावेळी तो मोठी झेप घेण्यासाठी सज्ज आहे.

विशेष म्हणजे, सिराज इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याने 23 विकेट्स घेतल्या आहेत. 2021-22 मध्ये जसप्रीत बुमराहनेही 23 विकेट्स घेत भुवनेश्वर कुमारचा (19) विक्रम मोडला होता.

Comments are closed.