0,0,0,0 आशिया कप मधील लज्जास्पद कामगिरीनंतरही सॅम आयुब नंबर 1 अष्टपैलू, हार्दिक पांड्याला मागे टाकलं
आयसीसीच्या ताज्या T20I अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. संपूर्ण स्पर्धेत खराब कामगिरी करणारा सॅम अयुब T20I मध्ये नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या क्रमवारीत अयुबने भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला मागे टाकले आहे. आशिया कप दरम्यान सॅम अयुब सातत्याने अपयशी ठरल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. शिवाय, तो या स्पर्धेत चार वेळा शून्यावर बाद झाला.
आयसीसीच्या ताज्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत सॅम अयुब नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे. या क्रमवारीत अयुबने भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला मागे टाकले आहे. त्याने चार गुणांची झेप घेत नंबर वन बनला आहे. अयुब आता 241 गुणांसह रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे, तर हार्दिक पांड्या 233 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी, माजी पाकिस्तानी खेळाडू सॅम अयुबचे कौतुक करत होते, परंतु उलट घडले. आशिया कप दरम्यान सलामीवीर फलंदाज म्हणून त्याने निराशा केली. कोणत्याही टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रमही अयुबच्या नावावर आहे. फलंदाज म्हणून अयुबने 7 सामन्यांमध्ये फक्त 37 धावा केल्या. तथापि, त्याने 7 सामन्यांमध्ये 6.40 च्या इकॉनॉमीने 8 बळी घेतले.
अंतिम सामन्यात न खेळल्यामुळे हार्दिकला रँकिंगमध्येही नुकसान झाले. खरं तर, दुखापतीमुळे तो पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळू शकला नाही. तथापि, तो अयुबपेक्षा फार मागे नाही. हार्दिक अयुबपेक्षा फक्त 8 गुणांनी मागे आहे, तो लवकरच त्याला मागे टाकू शकतो.
Comments are closed.