बांगलादेशच्या अडचणीत मोठी वाढ! आयसीसीकडून कडक कारवाई, BCB पूर्णपणे हतबल

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी बांगलादेशी पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या परवानगीची (Media Accreditation) पुन्हा एकदा तपासणी करत आहे. बांगलादेशने सुरक्षेचे कारण देत भारतात खेळण्यास नकार दिल्यामुळे, ICC ने आता त्यांच्या पत्रकारांच्या नोंदणी प्रक्रियेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. काही पत्रकारांचे अर्ज आधीच फेटाळण्यात आल्याचे समजते.

तब्बल 80-90 बांगलादेशी पत्रकारांनी या स्पर्धेसाठी अर्ज केले होते. मात्र, ICC नुसार पत्रकारांची ही संख्या 40 पेक्षा जास्त नसावी. जर बांगलादेशचा संघ खेळणार असता, तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात पत्रकारांना परवानगी देणे शक्य झाले नसते. आता सर्व बांगलादेशी पत्रकारांना नव्याने अर्ज करावे लागतील आणि ICC प्रत्येक अर्जाची स्वतंत्रपणे तपासणी करेल.

BCB चे मीडिया मॅनेजर अमजद हुसेन यांनी सांगितले की, त्यांनी हा प्रश्न ICC कडे मांडला आहे. पत्रकारांचे अर्ज का फेटाळले गेले, याचे लेखी स्पष्टीकरण त्यांनी मागितले आहे.

ICC च्या मते, बांगलादेश क्रिकेट संघाला भारतात कोणताही धोका नव्हता. तरीही बांगलादेश बोर्डाने आपली टीम भारतात पाठवण्यास नकार दिला होता, ज्यामुळे हा सर्व वाद निर्माण झाला आहे.

Comments are closed.