आशिया चषकात 4 वेळा शून्यावर बाद, तरीही पाकिस्तानचा अयुब नंबर 1; भारताच्या खेळाडूला टाकले मागे


आयसीसी टी 20 रँकिंग: आयसीसीने नुकतीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली आहे. या टी-20 च्या क्रमवारीत एक मोठा बदल झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) अव्वल स्थान गमवावे लागले आहे. 2025 च्या आशिया कपमध्ये चार वेळा शून्यावर बाद झालेला पाकिस्तानचा सईम अयुबची (Saim Ayub) आता टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत एका स्थानाने दुसऱ्या स्थानावर घसरला आहे, तर सईम अयुबची (Saim Ayub) चार स्थानांनी झेप घेऊन पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे नुकताच झालेल्या आशिया चषकात सईम अयुब चार सामन्यात शून्यावर बाद झाला होता. या आशिया चषकाच्या स्पर्धेत सईम अयुबने 7 सामन्यात फक्त 48 धावा केल्या. तर गोलंदाजीमध्ये सईम अयुबने चांगली कामगिरी केली. या आशिया कपमधील 7 सामन्यांमध्ये सईम आयुबने एकूण 8 विकेट्स घेतल्या.

अभिषेक शर्माने रचला इतिहास-

भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माने जागतिक फलंदाजी क्रमवारीत इतिहास रचला आहे. अभिषेक शर्मा सर्वाधिक रेटिंग गुणांसह फलंदाज बनला आहे. 25 वर्षीय अभिषेक शर्माने त्याचे सर्वोच्च रेटिंग (931) गाठून जवळजवळ पाच वर्षांचा विक्रम मोडला आहे. आशिया कपमधील प्रभावी कामगिरीनंतर अभिषेक शर्माने 931 गुणांची रेटिंग गाठली, अभिषेक शर्माने 2020 मध्ये इंग्लंडचा उजव्या हाताचा फलंदाज डेव्हिड मलानने मिळवलेल्या 919 गुणांच्या मागील सर्वोत्तम रेटिंगला मागे टाकले. अभिषेकने सर्वोच्च रेटिंग गुणांसाठी सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीलाही मागे टाकले आहे.

आशिया चषकाच्या स्पर्धेत अभिषेक शर्माची उत्कृष्ट कामगिरी-

2025 च्या आशिया कपमधील 7 सामन्यांमध्ये अभिषेकने 44.86 च्या सरासरीने 314 धावा केल्या. अभिषेक शर्माने सुपर-4 सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध 74 आणि बांगलादेशविरुद्ध 75 धावा केल्या. श्रीलंकेविरुद्ध 61 धावा केल्या. अभिषेक शर्माला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.

सायमर लाझिरवनचे नाव रेकॉर्ड आहे

आशिया चषक 2025 मधील सईम अयूबच्या कामगिरीकडे पाहिल्यास, तो पूर्णपणे अपयशी ठरला. ग्रुप स्टेजमधील सर्व तीन सामन्यांमध्ये तो शून्यावर बाद झाला. सुपर-4 मध्ये त्याला भारतविरुद्ध 21 धावा आणि श्रीलंकेविरुद्ध केवळ 2 धावा करता आल्या. बांगलादेशविरुद्ध पुन्हा एकदा शून्यावर बाद होत त्याने या स्पर्धेत एकूण चार वेळा ‘डक’वर बाद होण्याचा लाजीरवाणा विक्रम आपल्या नावे केला आहे. या स्पर्धेत अयूबने एकूण 25 चेंडूंमध्ये केवळ 23 धावा केल्या आहेत. T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फुल मेंबर देशांच्या खेळाडूंमध्ये एका मालिकेत सर्वाधिक वेळा ‘डक’वर बाद होणारा अयूब हा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम आंद्रे फ्लेचरच्या नावावर होता. तो 2009 T20 वर्ल्ड कपमध्ये तीन वेळा ‘डक’वर बाद झाला होता.

संबंधित बातमी:

Asia Cup 2025 Saim Ayub: बुमराहला 6 सिक्स मारण्याचं स्वप्न घेऊन आला, सलग 3 डावात शून्यावर बाद झाला; पाकच्या फलंदाजाची नाचक्की!

आणखी वाचा

Comments are closed.