आयसीसी क्रमवारीत अभिषेक शर्माची गरुड झेप, भल्या-भल्यांना टाकले मागे..!

इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अभिषेक शर्माने इतकी चांगली कामगिरी केली की जगभरातील फलंदाज मागे पडले. आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन टी20 क्रमवारीत अभिषेक शर्माने मोठी झेप घेतली आहे. तो कदाचित पहिल्या क्रमांकावर पोहोचला नसेल, पण तो अव्वल स्थानाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे ट्रॅव्हिस हेडची चिंता वाढली आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन टी20 क्रमवारीत अभिषेक शर्माने मोठी झेप घेतली आहे. यावेळी तो 38 स्थानांनी पुढे सरकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अभिषेक शर्माचे हे आतापर्यंतचे सर्वोच्च रँकिंग आहे. खरं तर, तो पहिल्यांदाच टॉप 10 मध्ये आला आहे. यासह, तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र, ट्रॅव्हिस हेड अजूनही अव्वल स्थानावर आहे. हेडचे रेटिंग सध्या 855 आहे. जर आपण अभिषेक शर्माबद्दल बोलायचे झाल्यास तर तो 829 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अभिषेक पुढे आल्याने सर्व फलंदाजांना त्यांच्या स्थानावरून एक स्थान खाली घसरावे लागले आहे.

सध्या, आयसीसी टी20 क्रमवारीत भारताच्या तिलक वर्माने एक स्थान गमावले आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग 803 आहे. इंग्लंडच्या फिल साॅल्टबद्दल बोलायचे झाले तर, त्यानेही एक स्थान गमावले आहे. तो आता 798 च्या रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सूर्यकुमार यादवलाही एक स्थान गमवावे लागले आहे. तो आता 738 च्या रेटिंगसह 5 व्या क्रमांकावर आहे.

जर आपण या टॉप 5 नंतर फलंदाजांबद्दल बोललो तर इंग्लंडच्या जोस बटलरनेही एक स्थान गमावले आहे. तो सध्या 729 रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम एका स्थानाने घसरून सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग 712 आहे. श्रीलंकेचा पथुम निस्सांका 707 रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान 704 रेटिंगसह 9व्या क्रमांकावर आहे. तर, श्रीलंकेचा कुसल परेराने त्याचे दहावे स्थान वाचवण्यात यश मिळवले आहे. त्याचे रेटिंग सध्या 675  आहे.

हेही वाचा-

IND vs ENG; वनडे मालिकेत कोणाचे पारडे जड? मालिकेपूर्वी पाहा संघाचे हेड टू हेड रेकाॅर्ड्स!
52 वर्षांच्या सचिनची जोरदार फटकेबाजी; फलंदाजी पाहून तुम्हीही म्हणाल, ‘देव तो देवच’, VIDEO
Rahul Dravid: बेंगलोरमध्ये द्रविडच्या गाडीची रिक्षाला धडक, भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.