ICC T20 Rankings: आयसीसी रँकिंगमध्ये या स्टारचा दबदबा कायम; जेकब बेथेलची टॉप 10 मध्ये एन्ट्री! सूर्याला मोठा फटका

आयसीसीने टी20 फलंदाजीची नवीन क्रमवारी (रँकिंग) जाहीर केली आहे. यामध्ये फार मोठे फेरबदल झाले नसले तरी काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत.

भारतीय संघाचा फलंदाज ईशान किशन (Ishaan kishan) 897 रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. 1 जुलैला त्याची रेटिंग 876 होती, त्यात वाढ झाली आहे, जरी काही दिवसांपूर्वी ही रेटिंग 904 पर्यंत पोहोचली होती. तसेच, ईशान किशनपाठोपाठ अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) 881 रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही अव्वल फलंदाजांमध्ये आता खूप कमी अंतर आहे.

इंग्लंडचा धाकड फलंदाज जेकब बेथेलने (Jeckob bhethel) 7 स्थानांची मोठी झेप घेतली असून तो आता 708 रेटिंग पॉइंट्ससह टॉप 10 मध्ये 8 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

तर, भारतीय संघाबाहेर असल्याचा परिणाम सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) रँकिंगवर झाला आहे. तो टॉप 10 मधून बाहेर पडून थेट 13 व्या क्रमांकावर घसरला आहे. त्याला पाच स्थानांचे नुकसान झाले असून त्याची रेटिंग 687 झाली आहे. सध्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात टी20 मालिका सुरू आहे. मालिकेतील चौथा सामना 9 जुलैला आणि शेवटचा सामना 11 जुलैला होणार आहे. या दोन सामन्यांमधील कामगिरीनंतर पुढच्या आठवड्यात जेव्हा रँकिंग अपडेट होईल, तेव्हा त्यात पुन्हा मोठे बदल पाहायला मिळू शकतात. मालिका संपल्यानंतर भारतीय खेळाडू कोणत्या स्थानावर असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments are closed.