T20 WC26: पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा खेळणार का? अखेर कॅप्टन सूर्याने केले स्पष्ट

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये रविवारी (१५ फेब्रुवारी) भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाणार आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने महत्वाची माहिती दिली आहे.

सूर्यकुमारने यावेळी अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे, असे म्हटले आहे.

या स्पर्धेत अभिषेकचे म्हणावे तसे पदार्पण झाले नाही. यूएसएविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर त्याची तब्येत खराब झाली. यामुळे त्याने त्या सामन्यात क्षेत्ररक्षणही केले नव्हते. नंतर त्याला पोटाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आणि तो नामिबियाविरुद्धच्या सामन्याला मुकला.

बातमी अपडेट होते आहे…

Comments are closed.