IND Vs PAK – इशान किशनच्या वादळाचा पाकिस्तानला जोरदार तडाखा, गोलंदाजांना चोपून काढत अर्धशतक झळकावलं

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत हिंदुस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, टीम इंडियाची सुरुवात थोडी खराब झाली. सर्वांच्या नजरा ज्या फलंदाजावर खिळल्या होत्या, तो अभिषेक शर्मा भोपळाही न फोडता बाद झाला. मात्र, अभिषेक शर्माची कमतरता इशान किशनने जानवू दिली नाही. पहिले षटक शांततेत खेळल्यानंतर दुसऱ्या षटकापासून इशान किशनने आपली तोडफोड फटकेबाजी सुरू केली आणि 27 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकलं.

अभिषेक शर्माची पहिल्याच षटकात विकेट गेल्यामुळे टीम इंडियावर दडपण आलं होतं. मात्र, इशान किशनने धडाकेबाज अंदाजात पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. कर्णधार सलमान आगालाही त्याने फोडून काढलं. त्याची विस्फोटक फटकेबाजी अजूनही सुरुच असून त्याने 8 षटकांचा खेळ संपला तेव्हा 37 चेंडूंमध्ये 72 धावांची वादळी खेळी केली आहे. यामध्ये 9 चौकार आणि तीन खणखणीत षटकारांचा समावेश आहे. तिलक वर्मा आणि इशान किशनने मिळून 42 चेंडूंमध्ये 81 धावाची भागीदारी केली आहे.

Comments are closed.