संजू सॅमसनच्या 97 धावांचे गौतम गंभीर कनेक्शन! 6 वर्षाआधी केलेली भविष्यवाणी ठरली खरी

भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीमुळे संघ आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या उपांत्य फेरीत पोहोचला. त्याचबरोबर त्याने गौतम गंभीरच्या भविष्यवाणीलाही खरे ठरवले. रविवारी (१ मार्च) कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजने भारतासमोर १९६ धावसंख्येचे लक्ष्य ठेवले होते. तेव्हा संजूने जबरदस्त फलंदाजी करत ५० चेंडूमध्ये १२ चौकार आणि ४ षटकार मारले आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याची ही खेळी पाहून चाहत्यांनी नक्कीच गंभीरची आठवण आली असेल.
संजू २०२०मध्ये राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळत होता. तेव्हा त्याने एका सामन्यात उत्तम खेळी केली होती. ती पाहून गंभीरने तो एक भारताचा उत्तम विकेटकीपर-फलंदाजच नाहीतर सर्वोत्तम युवा फलंदाजही आहे. त्याने म्हटले होते, “संजू एक उत्तम युवा फलंदाज असून तो भारतासाठी नाही खेळला तर हे त्याचे नाही भारताचे नुकसान होईल. तेव्हा त्याने संजूला विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या अनेक संधी मिळाल्या पाहिजे. जेणेकरून तो ही एक जागतिक स्तरावरील सर्वोत्तम फलंदाज बनेल.”
गंभीरचे हे वक्तव्य तेव्हा खूप चर्चेत आले होते. तसे पाहिले तर संजूला अनेक संधी मिळाल्या नाही. तो अनेकदा संघाबाहेर राहिला, मात्र गंभीरने त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवला होता. आता स्थिती वेगळी आहे गंभीर स्वत: भारताचा मुख्य प्रशिक्षक आहे आणि सॅमसनने तशीच कामगिरी केली जसे गंभीरने काही वर्षांआधी म्हटले होते.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यानंतर गंभीर म्हणाला, “तो एक उत्तम (वर्ल्ड क्लास) खेळाडू आहे. संघाला जेव्हा आवश्यकता होती तेव्हा त्याने चांगली खेळी केली. त्याच्या कामगिरीत असेच सातत्य राहावे, कारण आणखी दोन सामने बाकी आहेत. आम्हाला संजूच्या टॅलेंटबाबत खात्री आहे.”
या सामन्यात संजू शतकापासून केवळ ३ धावा दूर राहिला. गंभीरनेही २०११च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ९७ धावा केल्या होत्या. आता त्याच्या शिष्याने संजूनेही तशीच कामगिरी केली आहे. दोघांनीही मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघासाठी ९७ धावा केल्या.
Comments are closed.