ICC T20 World Cup 2026 – अफगाणिस्तानला धक्का द्यावाच लागणार
अफगाणिस्तानला आपले सुपर एटमधील आव्हान कायम राखण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकन संघाला धक्का द्यावाच लागणार. न्यूझीलंडविरुद्ध हरल्यामुळे अफगाणिस्तानसाठी करो या मरोची झुंज द्यावी लागणार आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका सलग दुसरा विजय नोंदवत पुन्हा एकदा सुपर एटमध्ये एण्ट्री करण्यासाठी उत्सुक आहे.
राशीद खानच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अफगाणिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध सूर गवसला नव्हता. किवी गोलंदाजांनी अफगाणिस्तानी फलंदाजांचे कच्चे दुवे ओळखत त्यांना आक्रमक होऊ दिले नाही.
अंतिम संघ यातून निवडला जाईल
दक्षिण आफ्रिका ः एडन मारक्रम (कर्णधार), का@र्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डिका@क (यष्टिरक्षक), माकाx यान्सन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एन्रिक नॉर्किया, कगिसो रबाडा, रायन रिकल्टन, ट्रिस्टन स्टब्स.
अफगाणिस्तान ः राशीद खान (कर्णधार), इब्राहिम झदरान, अब्दोल्लाह अहमदझाई, अझमतुल्लाह ओमरझाई, दारवीश रसुली, फझलहक फारुकी, गुलबदीन नईब, मोहम्मद इशाक (यष्टिरक्षक), मोहम्मद नबी, मुजीबूर रहमान, नूर अहमद, रहमतुल्लाह गुरबाज, सेदिपुल्लाह अटल, शाहिदुल्लाह, झिऊर रहमान.
Comments are closed.