IND vs PAK – खेळणार नाही म्हणून रडले अन् आता मैदानात येऊन हरले; पाकिस्तानचा धुव्वा उडवत हिंदुस्थानची सुपर 8 मध्ये धडक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

श्रीलंकेतील कोलंबोमध्ये पार पडलेल्या हिंदुस्थानविरुद्ध पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्यात हिंदुस्थानने निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केलं. हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला 176 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी फलंदाज मैदानात हजेरी लावून माघारी परतत होते. हार्दिक पंड्याने पहिल्याच षटकात पाकिस्तानला मोठा हादरा दिला. 73 धावांवर पाकिस्तानचा अर्ध संघ तंबूत बसून उर्वरित सामना पाहत होता. हिंदुस्थानी गोलंदाजांची चपळ, चालाक आणि घातक गोलंदाजीपुढे फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलं आणि पाकिस्तानचा संपूर्ण संघ 114 धावांमध्ये बाद झाला. हिंदुस्थानने 61 धावांनी रुबाबात विजयी जल्लोष केला. या जल्लोषाचे हकदार ठरले ते, हार्दिक पंड्या (2 विकेट), जसप्रीत बुमराह (2), अक्षर पटेल (2), वरून चक्रवर्ती (2), कुलदीप यादव (1) आणि तिलक वर्मा (1) हे टीम इंडियाचे गोलंदाज. या विजयासह टीम इंडियाने सुपर 8 मध्ये आपली जागा पक्की केली आहे.

Comments are closed.