पावसामुळे न्यूझीलंडचं वाट्टोळं, टीम इंडियाला फायदा; वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी ने


आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 गुण सारणी: पावसाच्या व्यत्ययामुळे महिला विश्वचषक स्पर्धेत काल (14 ऑक्टोबर) झालेला श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड (SL W vs NZ W) सामना रद्द झाला. दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत श्रीलंकेचा दुसरा सामना रद्द झाला. याआधी पावसामुळे त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामनाही रद्द झाला होता. दरम्यान, श्रीलंका आणि न्यूझीलंडचा सामना रद्द झाल्यामुळे याचा गुणतालिकेत भारताला फायदा (Women ODI World Cup 2025 Points Table) झाला आहे.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी श्रीलंकेने 50 षटकांत 6 बाद 258 धावा (SL W vs NZ W) केल्या. मात्र न्यूझीलंडने धावांचा पाठलाग सुरू करण्यापूर्वीच पुन्हा पाऊस सुरु झाला आणि सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. श्रीलंकेकडून निलक्षीका डी सिल्वा नाबाद 55 धावा आणि कर्णधार चामारी अटापट्टू 53 धावांच्या खेळीमुळे अटापट्टूने 72 चेंडूंच्या संयमी खेळीत सात चौकार मारले, तर निलक्षीकाने 28 चेंडूंच्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार मारत स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक झळकावले.

गुणतालिकेत न्यूझीलंडला धक्का, भारताला फायदा- (Women Cricket World Cup 2025 Points Table Team India)

श्रीलंका चार सामन्यांतून दोन गुणांसह सातव्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंड तीन गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडचा सामना रद्द झाल्यामुळे न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. यामुळे न्यूझीलंडला उपांत्य फेरीत पोहोचणे कठीण झाला आहे. तर दुसरीकडे सामना  रद्द झाल्यामुळे भारताला चांगला फायदा मिळणार आहे. भारतीय संघ आता 10 गुणांपर्यंत पोहोचू शकतो, तर न्यूझीलंडला फक्त 9 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. भारत आणि न्यूझीलंडचाही सामना रंगणार आहे. न्यूझीलंडविरुद्धचा हा सामान भारताने जिंकल्यास उपांत्य फेरीतील प्रवेश जवळजवळ निश्चित आहे.

टीम इंडियावर टॉप-4 मधून बाहेर पडण्याचा धोका (Womens Team India Points Table)

टीम इंडिया तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली आहे. सलग दोन सामने जिंकून स्पर्धेची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला गेल्या दोन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे त्यांना टॉप-4 मधून बाहेर पडण्याचा धोका आहे. पुढील सर्व सामने भारताला कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. टीम इंडियाने आगामी तीन सामन्यांमधून एकही सामना गमावला तर सेमीफायनलचा मार्ग खूप कठीण होईल. टीम इंडियासाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांना अजूनही न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांशी खेळावे लागणार आहे.

ही बातमीही वाचा:

VIDEO: अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं…; दिल्लीत रोहित शर्मा अन् विराट कोहलीला एकत्र पाहून सर्व भावूक, टीम इंडिया ऑस्ट्रेलियासाठी रवाना

आणखी वाचा

Comments are closed.