सेमीफायनलच्या चौथ्या जागेसाठी पाचही संघांना संधी; कोण मारणार बाजी?, वर्ल्डकपचं च्रकावणारं Point
महिला विश्वचषक 2025 उपांत्य फेरीतील पात्रता परिस्थिती गुण सारणी : कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आधीच उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. आता भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या पाच संघांमध्ये चौथ्या स्थानासाठी स्पर्धा रंगणार आहे. मात्र, 23 ऑक्टोबर रोजी होणारा न्यूझीलंडविरुद्धचा सामना भारतासाठी निर्णायक ठरणार आहे.
भारतीय संघाचं सेमीफायनलचं गणित (टीम इंडिया सेमीफायनल पात्रता परिस्थिती)
इंग्लंडने भारतावर 4 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला आहे. आता आठ लीग सामने बाकी आहेत आणि उर्वरित पाच संघ शेवटच्या उपांत्य स्थानासाठी झुंजणार आहेत. भारताने आतापर्यंत 5 सामने खेळले असून, त्यातील दोन जिंकले आणि तीन हरले आहेत. टीम इंडियाचा नेट रनरेट +0.526 असा आहे. भारताने जर न्यूझीलंड आणि बांगलादेशचा पराभव केला, तर त्याचे 8 गुण होतील आणि तो उपांत्य फेरीत पोहोचेल. मात्र, जर पुढील दोनपैकी फक्त एकच सामना जिंकला, तर इतर संघांच्या निकालांवर त्याचे भविष्य अवलंबून राहील.
न्यूझीलंड संघाचं सेमीफायनलचं गणित (न्यूझीलंड सेमीफायनल पात्रता परिस्थिती)
न्यूझीलंडने आतापर्यंत 5 सामने खेळले असून, त्यातील एक जिंकले आणि दोन हरले आहेत. तर दोन पावसामुळे वाया गेले आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट -0.245 असा आहे. त्यामुळे त्यांचा भारताविरुद्धचा सामना ‘करो या मरो’ असा असेल. जर तो भारताकडून हरला, तर त्याचा विश्वचषक प्रवास संपेल. जर त्याने पुढील दोन्ही सामने जिंकले, तर तो उपांत्य फेरीत जाईल. भारतावर विजय मिळवला पण इंग्लंडकडून पराभव झाला, तर त्याला बांगलादेश-श्रीलंका सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लागावा लागेल.
बांगलादेश संघाचं सेमीफायनलचं गणित (बांगलादेश उपांत्य फेरीतील पात्रता परिस्थिती)
न्यूझीलंडने आतापर्यंत 5 सामने खेळले असून, त्यातील एक जिंकले आणि चार हरले आहेत. न्यूझीलंडचा नेट रनरेट -0.676 असा आहे. एकच सामना जिंकूनही बांगलादेश अजून स्पर्धेत आहे. त्यांना श्रीलंका आणि भारतविरुद्ध दोन्ही सामने जिंकावे लागतील, आणि इंग्लंडने न्यूझीलंडला हरवण्याची अपेक्षा ठेवावी लागेल. भारत आणि न्यूझीलंड दोघांचे 6 गुण झाले, तरी बांगलादेशला नेट रनरेट सुधारून मोठ्या फरकाने विजय मिळवावे लागतील, कारण सध्या त्यांचा रनरेट भारतापेक्षा खूप कमी आहे.
श्रीलंका आणि पाकिस्तान संघाचं सेमीफायनलचं गणित
श्रीलंका आणि पाकिस्तान दोन्ही संघाने आतापर्यंत 5 सामने खेळले असून, त्यातील एक पण जिंकला नाही. श्रीलंकाचा नेट रनरेट-1.564 असा आहे. तर पाकिस्तानचा नेट रनरेट -1.887 असा आहे. आतापर्यंत एकही विजय मिळवलेला नसला तरी, श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ उपांत्य फेरीसाठी शर्यतीत आहेत. श्रीलंकेला पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि भारत उर्वरित दोन्ही सामने हरावा लागेल, अशी अपेक्षा ठेवावी लागेल. यासोबतच इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करणेही आवश्यक आहे. या परिस्थितीत श्रीलंकेचे 6 गुण होतील, पण मोठ्या फरकाने विजय मिळवला नाही, तर नेट रनरेटच्या आधारावर ती मागे पडू शकते. पाकिस्तानलाही दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल, जेणेकरून त्याचा नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा चांगला होईल.
आणखी वाचा
Comments are closed.