IND W Vs NZ W – अगदी थाटात; न्यूझीलंडचा 53 धावांनी धुव्वा उडवत हिंदुस्थानच्या पोरींची सेमी फायनलमध्ये धडक

सेमी फायनलमध्ये पोहचण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा सामन्यात टीम इंडियाने बाजी मारत न्यूझीलंडचा 53 धावांनी धुव्वा उडवला आहे. प्रथम फलंदाजांनी आणि नंतर गोलंदाजांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे टीम इंडियाने अगदी थाटात सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. तर न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड कपमधून बाहेर फेकला गेला आहे. हिंदुस्थान व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी सेमी फायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे.

Comments are closed.