बांगलादेश-पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर; आता 1 जागा अन् 3 संघांमध्ये चुरस, टीम इंडियासाठी समीकरण
ICC महिला विश्वचषक 2025 नवीनतम गुण सारणी: आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या स्पर्धेत काल (22 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 6 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 6 सामने खेळले असून यामध्ये 5 सामन्यात विजय मिळवला. तर एक सामना अनिर्णित राहिला. महिला एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियन महिला विरोधी संघांचा धुव्वा उडवत आहे. ऑस्ट्रेलियाचा महिला संघ दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे.
2025 च्या विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया संघाचा हा पाचवा विजय ठरला आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने फलंदाजीसाठी उतरून निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून 244 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. त्यांच्या संघाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाने 64 धावांत चार विकेट्स गमावल्या, पण त्यानंतर गार्डनर आणि सदरलँड यांनी नाबाद 180 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला 40.3 षटकांत सामना जिंकता आला.
ऑस्ट्रेलियाच्या क्लिनिकल प्रदर्शनात त्यांनी इंग्लंडवर पाचव्या विजयासाठी मात केली #CWC25 👊🇦🇺#AUSvENG pic.twitter.com/0tTPJxoVku
— ICC क्रिकेट विश्वचषक (@cricketworldcup) 22 ऑक्टोबर 2025
आता 1 जागा अन् 3 संघांमध्ये चुरस-
विश्वचषक उपांत्य फेरीसाठी तीन संघ पात्र ठरले आहेत. या संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान महिला संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. उपांत्य फेरीतील एकमेव स्थान मिळविण्याच्या शर्यतीत तीन संघांमध्ये चुरस रंगली आहे. यामध्ये भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा समावेश आहे.
भारतासाठी आज करो या मरोचा सामना-
महिला विश्वचषकात आज भारत विरूद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. भारतासाठी आजचा सामना करो या मरो अशा स्थितीत खेळावा लागणार आहे. आजच्या सामन्यात पराभव भारताला परवडणार नाही. थेट स्पर्धेतून आव्हान संपुष्यात येण्याची नामुष्की भारतावर येऊ शकते. मात्र भारत विजयी झाल्यास थेट सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा जिवंत राहतील.
न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी भारत सज्ज झाला आहे #CWC25 👊
पकडा तुमचा #INDvNZ आता तिकिटे ➡️ https://t.co/MsbMpBHni2 pic.twitter.com/wXzz9O02PJ
— ICC क्रिकेट विश्वचषक (@cricketworldcup) 22 ऑक्टोबर 2025
ही बातमीही वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.