3 संघ पात्र, बांगलादेश वर्ल्डकपमधून बाहेर; श्रीलंकेच्या विजयाने गुणतालिकेत उलथापालथ, टीम इंडिया


आयसीसी महिला विश्वचषक 2025 गुण सारणी: महिला विश्वचषक 2025 चा 21 वा सामना (ICC Womens World Cup 2025) बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 7 धावांनी पराभव केला. एकवेळ अशी होती, तेव्हा बांगलादेशला 12 चेंडूत 12 धावांची गरज होती. मात्र फक्त 9 चेंडूत सामना पूर्णपणे बदलून गेला. 49 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बांगलादेशची पाचवी विकेट पडली आणि बांगलादेश संघाची एकूण धावसंख्या 193 धावांवर पोहोचली. त्यानंतर बांगलादेशच्या विकेट्स पडत राहिल्या आणि 50 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूपर्यंत बांगलादेशने 194 धावांवर 9 विकेट्स गमावल्या. यासह श्रीलंकेने हा सामना फक्त 7 धावांनी जिंकला. बांगलादेश या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडला आहे. श्रीलंकेच्या बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर विश्वचषकाच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनलसाठी आतापर्यंत 3 संघ क्वालिफाय झाले आहेत. तर चौथ्या जागेसाठी अद्यापही 4 संघामध्ये चुरस (Womens World Cup 2025 Points Table) रंगली आहे. भारताला (Womens Team India) उपांत्य फेरी गाठायची असल्यास पुढील न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धचे सामना काहीही करुन जिंकावे लागतील.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या 3 संघांनी उपांत्य फेरीत (Semifinal Qualification) प्रवेश मिळवला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, ऑस्ट्रेलिया 9 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाने 5 पैकी 4 सामने जिंकलेत. तर 1 सामना पावसामुळे वाया गेला. ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट हा +1.818 असा आहे. इंग्लंड पॉइंट्स टेबलमध्ये दुसर्‍या स्थानी आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची कामगिरी सारखीच आहे. मात्र इंग्लंडचा नेट रनरेट हा ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत थोडा कमी आहे. इंग्लंडचा नेट रनरेट हा +1.490 इतका आहे. तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट हा -0.440 असा आहे. दक्षिण आफ्रिकेची या स्पर्धेत पराभवाने सुरुवात झाली. मात्र दक्षिण आफ्रिकेने त्यानंतर सलग 4 सामने जिंकले.

भारतीय संघाचं सेमीफायनलचं गणित (Team India Semifinal Qualification Scenario)

इंग्लंडने भारतावर 4 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला आहे. आता आठ लीग सामने बाकी आहेत आणि उर्वरित पाच संघ शेवटच्या उपांत्य स्थानासाठी झुंजणार आहेत. भारताने आतापर्यंत 5 सामने खेळले असून, त्यातील दोन जिंकले आणि तीन हरले आहेत. टीम इंडियाचा नेट रनरेट +0.526 असा आहे. भारताने जर न्यूझीलंड आणि बांगलादेशचा पराभव केला, तर त्याचे 8 गुण होतील आणि तो उपांत्य फेरीत पोहोचेल. मात्र, जर पुढील दोनपैकी फक्त एकच सामना जिंकला, तर इतर संघांच्या निकालांवर त्याचे भविष्य अवलंबून राहील.

न्यूझीलंड संघाचं सेमीफायनलचं गणित (New Zealand Semifinal Qualification Scenario)

न्यूझीलंडने आतापर्यंत 5 सामने खेळले असून, त्यातील एक जिंकले आणि दोन हरले आहेत. तर दोन पावसामुळे वाया गेले आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट -0.245 असा आहे. त्यामुळे त्यांचा भारताविरुद्धचा सामना ‘करो या मरो’ असा असेल. जर तो भारताकडून हरला, तर त्याचा विश्वचषक प्रवास संपेल. जर त्याने पुढील दोन्ही सामने जिंकले, तर तो उपांत्य फेरीत जाईल. भारतावर विजय मिळवला पण इंग्लंडकडून पराभव झाला, तर त्याला बांगलादेश-श्रीलंका सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लागावा लागेल.

ही बातमीही वाचा:

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा खळबळ, अचानक मोहम्मद रिझवानला कर्णधारपदावरुन हटवले, कोणाला नियुक्त केले?

आणखी वाचा

Comments are closed.