IND Vs AUS – ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपला, टीम इंडियाला फायनलमध्ये धडक मारण्यासाठी 339 धावांचं आव्हान

ICC Women’s World Cup 2025 मध्ये सध्या टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये नवी मुंबईतीत डी.व्हाय.पाटील स्टेडिमयवर सेमी फायनलचा थरार सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 339 धावांचे तगडे आव्हान दिले आहे. फोबी लिचफिल्डने 93 चेंडूंमध्ये 17 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 119 धावांची तुफानी खेळी केली. तसेच एलिस पेरी (77), अॅशले गार्डनर (63) यांनी केलेल्या धुवांधार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने सर्वगडीबाद 338 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे टीम इंडियाला आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 339 धावा करायच्या आहेत. टीम इंडियाकडून दीप्ती शर्मा आणि एन चरणी हिने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर, क्रांती गौड, अमनजोत कौर आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

Comments are closed.