Personality Test : केसांचा रंग आणि लांबीवरून ओळखा व्यक्तीमत्त्व
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकाचा स्वभाव, वागण्या-बोलण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. मग ती स्त्री असो वा पुरूष. चार शब्द बोलल्यावर आपण त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावतो. पण, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? केसांच्या नैसर्गिक रंगावरून आणि लांबीवरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखता येऊ शकतो. तुमचे केस आणि त्याची लांबी बरेच काही सांगतात. याद्वारे एखाद्या व्यक्तीचा स्वभावाचा अंदाज लावता येतो. केस हे स्त्री आणि पुरूष या दोघांच्या सुंदरतेचे प्रतीक आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या केसांचा रंग आणि त्याची लांबी वेगळी असते. त्यामुळे चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात, केसांचा रंग आणि लांबीवरून एखाद्याचे व्यक्तीमत्त्व केस ओळखायचे
काळे केस –
नैसर्गिकपणे काळा रंग असणाऱ्या व्यक्ती कोणत्याही गोष्टीचा गंभीरपणे विचार करतात. याशिवाय हातातील सर्व कामे पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार असतो.
ब्राऊन रंग –
ज्या व्यक्तीचे केस ब्राऊन असतात, अशा व्यक्ती स्वभावाने मनमिळावू असतात. त्यांना नवनवीन लोकांशी मैत्री करायला आवडते. या व्यक्ती पूर्ण एनर्जीने भरलेल्या असतात शिवाय खूप सरळ-साध्या स्वभावाची असतात.
सोनेरी केस –
सोनेरी रंगाचे केस असणाऱ्या व्यक्ती कायम आनंदात राहतात. तसेच आयुष्यातील प्रत्येक गोष्टींचा आनंद घेतात.
पांढरे केस –
काही लोकांचे केस हे पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचे असतात. अशा व्यक्ती बुद्धिमान असतात. या व्यक्तींचा स्वभाव खूप शांत असतो.
लहान केस –
लहान केस असणाऱ्या व्यक्ती स्पष्टवक्ता असतात. या लोकांना नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात. हे लोक आयुष्यातील अराजकता सहन करू शकत नाही.
लांब केस –
लांब केस हाताळणे सोपे नसते. यासाठी खूप संयम आवश्यक आहे, त्यामुळे या व्यक्ती संयमी असतात. लांब केस असलेल्या स्त्रिया नातेसंबंधात जोडीदाराचा आदर करतात आणि नाते निष्ठेने जपतात.
खांद्यापर्यत असणारे केस –
ज्या स्त्रियांचे केस त्याच्या खांद्यापर्यत असतात, अशा स्त्रियांशी मैत्री जास्त प्रमाणात केली जाते. असे केस सौंदर्य तर वाढवतातच शिवाय स्त्रीचे व्यक्तीमत्त्व देखील खुलवतात.
हेही पाहा –
Comments are closed.