उद्ध्वस्त झालेल्या एअरबेसवरील धावपट्टी विजयासारखी दिसते का? यूएनमध्ये हिंदुस्थानने पाकड्यांची खिल्ली उडवली

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हास्यास्पद दावे केले होते. हिंदुस्थानचे 7 लढाऊ विमानं पाडल्याचा दावा करत शरीफ यांनी विजय मिळवल्याचे म्हटले होते. मात्र त्यांचा दावा हिंदुस्थानने खोडून काढला. उद्ध्वस्त झालेल्या एअरबेसवरील धावपट्टी तुम्हाला विजयासारखी दिसते का? अशा शब्दात हिंदुस्थानच्या राजनैतिक अधिकारी पेटल गहलोत यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली.

हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानच्या एअर बेसवर केलेल्या विध्वंसाचे फोटो सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत. एअरबेसवरील उद्ध्वस्त धावपट्टी आणि जळून खाक झालेले हँगर पंतप्रधानांनी दावा केल्याप्रमाणे विजयासारखे दिसत असतील आणि पाकिस्तान त्याचा आनंद घेत असेल तर त्यांचे स्वागत आहे, असे पेटल गहलोत म्हणाल्या.

ट्रम्प म्हणाले… शाहबाज महान नेते! व्हाइट हाऊसमध्ये शरीफ-मुनीर यांना पायघड्या

एक चित्र हजार शब्दांहून अधिक बोलके असते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान हिंदुस्थानी सैन्याने दहशतवादी अड्ड्यांवर मारलेल्या दहशतवाद्यांचे अनेक चित्र आम्ही पाहिले. या दहशतवाद्यांचा पाकिस्तानी सैन्य आणि लोक प्रतिनिधी गौरव करतात, त्यांना श्रद्धांजली वाहतात तेव्हा या राजवटीच्या कृतींबद्दल काही शंका असू शकते का? असा सवाल गहलोत यांनी केला. तसेच कितीही खोटे बोलले तरी सत्य लपवता येत नाही, असे म्हणत गहलोत यांनी यूएनच्या मंचावरून जाहीरपणे खोटे बोलणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पाणउतारा केला.

Comments are closed.