IND vs PAK: ट्रॉफी जिंकायची असेल तर भारताने फायनलमध्ये या 3 चुका टाळणे गरजेचे? जाणून घ्या सविस्तर!
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 28 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना झाला होता, हा सामना जिंकून पाकिस्तानने फायनलमध्ये आपली जागा पक्की केली. आता आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तिसऱ्यांदा टक्कर पाहायला मिळणार आहे. याआधी झालेल्या दोन्ही सामन्यांत सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. मात्र अंतिम सामन्यात टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध 3 चुका करण्यापासून दूर राहू इच्छिते.
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी आशिया कप 2025 फारसा खास ठरलेला नाही. सूर्यकुमारने आपल्या फलंदाजीने चाहते आणि टीमला निराश केले आहे. मागील सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारतीय कर्णधार खातेही उघडू शकला नव्हता. आतापर्यंत या स्पर्धेत सूर्यकुमार यादवने फक्त 59 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध कर्णधार सूर्यकुमार यादवकडून चांगल्या कामगिरीची चाहत्यांना अपेक्षा असेल.
आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाची फील्डिंगही फारशी चांगली राहिलेली नाही, जी कुठेतरी संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. आतापर्यंत भारताने 12 झेल टाकले आहेत. त्यापैकी तब्बल 8 झेल सुपर-4 च्या 2 सामन्यांत गळाले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यात भारताला आपली फील्डिंग सुधारावी लागणार आहे. सर्वसत्रदरम्यान भारतीय खेळाडू झेल पकडण्याचा जोरदार सराव करत आहेत.
मागील काही सामन्यांत भारताने फलंदाजी ऑर्डरमध्ये सतत बदल केलेले दिसले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नंबर-3 वर शिवम दुबेला (Shivam Dube) फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते, तर या क्रमांकावर नेहमी कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजी करतो. याशिवाय संजू सॅमसन (Sanju Samson) नंबर-5 वर फलंदाजी करतो, पण त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नव्हती.
त्याआधी ओमानविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव वगळता जवळपास सर्वांनी फलंदाजी केली होती, पण कर्णधार नंबर-10 पर्यंतही फलंदाजीला आला नव्हता. अशा प्रकारच्या चुका टीम इंडियाने अंतिम सामन्यात टाळल्या पाहिजेत.
Comments are closed.