…तर तुम्हाला शहरात येताही येणार नाही; भाजप आमदार संजय केनेकर यांनी मिंध्यांच्या नेत्यांना भरसभेत सुनावले

छत्रपती संभाजीनगरातील मामा काणे चौकात झालेल्या सभेत भाजप आमदार संजय केनेकर यांनी मिंध्यांचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना चांगलेच सुनावले आहे. तुम्ही जिल्ह्याचे पालक असाल तर आम्ही मालक आहोत, तुम्ही कमळाच्या पिचवर खेळताय हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत त्यांनी शिरसाट यांना सुनावले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत तुम्ही मुलगा, मुलगी आणि पीएलाच तिकिट देता, इतर कार्यकर्त्यांचा विचार का करत नाही? असा सवालही त्यांनी केला. पदमपुऱ्यातील कार्यकर्त्यांना रहायला घरे नाहीत पण तुम्ही पदमपुरा सोडून व्हाईट हाऊस मध्ये रहायला गेले आणि कार्यतर्त्यांकडे दुर्लक्ष केले, असे ते म्हणाले. त्यामुळे जनतेने तुमच्याकडे पाठ फिरवली तर तुम्हाला शहरात येताही येणार नाही. ज्या मामा चौकातून तुम्ही मोठे झाला तिथेच तुमचे विसर्जन होऊ शकते, असा हल्लाबोल संजय केनेकरांनी संजय शिरसाट यांच्यावर केला.

किती दिवस कार्यकर्ते तुमची गुलामी सहन करतील? पदमपुऱ्यात तुम्ही साधे मंगल कार्यालय उभे करू शकले नाहीत. तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहात, आम्ही महाराष्ट्राचे मालक आहोत, हे विसरू नका, असे केनेकरांनी शिरसाटांना बजावले. कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने मोठे झाले त्यांनी पदमपुऱ्यात काय केले? ज्या हिंदुत्वाच्या जीवावर तुम्ही मोठे झाला आणि पदमपुरा सोडून व्हाइट हाऊसला गेलात, तिथल्या कार्यकर्त्यांची अवस्था काय आहे ते पाहिले का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

त्यांनी किती घरे उद्ध्वस्त केली, ज्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झाले. त्यांना विसरून व्हाईट हाऊसमध्ये जाऊन बसले. तिकीट कुणाला दिले, तुमच्या पीएला आणि पोरांना..कार्यकर्ते कुठे गेले होते. तुम्ही कंत्राटदाराला नगरसेवक करता, तुम्ही पीएला नगरसेवक करता, तुमच्या पोरांना नगरसेवक करतात. परंतु ज्यांनी समर्पण केले त्यांच्या लेकरांना विचारा त्यांची काय अवस्था आहे? या जनतेने तुमच्याकडे पाठ फिरवली तर तुम्हाला परत शहरात राहता येणार नाही. ज्या मामा चौकातून तुम्ही मोठे झाला तिथेच तुमचे विसर्जन होऊ शकते असा हल्लाबोल संजय केनेकरांनी संजय शिरसाट यांच्यावर केला.

हिंदुत्वाच्या गप्पा आम्हाला शिकवू नका. जनावरांची अवैध कत्तल येथे सुरू आहे. तुमच्या डोळ्यादेखत होते. तुम्ही पालकमंत्री असताना काय चाललंय हे आम्हाला माहिती आहे. २५ वर्ष झाले फक्त ८ ते १० दिवसात एकदाच लोकांना पाणी मिळते. तुमच्याकडे २५ नळ आहेत परंतु एक नळही कार्यकर्त्यांच्या घरात नाही. आता तुमचे विसर्जन निश्चित आहे. माझ्याकडे खूप हिशोब आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

Comments are closed.