IND vs PAK: टीम इंडियाचे हे 3 खेळाडू फेल झाले, तर टीम इंडियाला चुकवावी लागेल मोठी किंमत! जाणून घ्या का?

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात काही तासांत महामुकाबला रंगणार आहे. आशिया कपमधील या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टीम इंडिया खूप मजबूत दिसत आहे आणि त्यांच्या जिंकण्याच्या शक्यता जास्त मानल्या जात आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादवकडे (Captain Suryakumar Yadav) असे अनेक खेळाडू आहेत जे एकट्यानेही सामन्याचा निकाल बदलू शकतात. पण जर सूर्याकुमारचे 3 महत्त्वाचे खेळाडू फेल झाले, तर टीम इंडियाला मोठी किंमत चुकवावी लागू शकते.

सूर्यकुमार यादव पाकिस्तानविरुद्धही तीच टीम घेऊन उतरू शकतो जी यूएईविरुद्ध खेळली होती. त्याच मैदानावर ही भिड़ंत होणार असल्याने जिंकण्याचे कॉम्बिनेशन बदलण्याचे कारण नाही. पाकिस्तानविरुद्ध कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) विक्रम भन्नाट आहे. त्याने शेजाऱ्यांविरुद्ध वनडे आणि टी20 मिळून 6 सामने खेळले आहेत आणि 15 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यूएईविरुद्ध त्याने 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात त्याचं चांगलं खेळणं खूप गरजेचं आहे.

हार्दिक पांड्या (Hardik pandya) हा संघाचा सर्वात महत्त्वाचा ऑलराऊंडर आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीने संघाला मोठा आधार देतो. अर्शदीप सिंगच्या (Arshdeep singh) गैरहजेरीत जसप्रीत बुमराहनंतर (Jasprit Bumrah) गोलंदाजीचं दडपण हार्दिकवर येणार आहे. त्याला काही महत्वाची षटके टाकण्याची जबाबदारी द्यावी लागू शकते. जर भारतीय संघाचा टॉप ऑर्डर फ्लॉप झाला, तर हार्दिकवरच धावा करण्याची जबाबदारी येईल.

याशिवाय सूर्याकुमारचा तिसरा मोठा आधार म्हणजे अभिषेक शर्मा (Abhishek Sharma). तो टीममध्ये आल्यापासून भारताची पॉवरप्लेतील कामगिरी जोरदार राहिली आहे. तो नेहमीच तुफानी सुरुवात करून देतो. यूएईविरुद्धही त्याने आक्रमक फलंदाजी केली होती.

टीम इंडिया एकूणचं पाकिस्तानपेक्षा खूप मजबूत आहे. पण जर पराभव झाला, तर फॅन्सकडून सूर्या ब्रिगेडला जोरदार ट्रोलिंगला सामोरं जावं लागू शकतं. सुपर-4 मध्ये जाण्यापूर्वी भारत ग्रुप स्टेजमध्ये पहिल्या क्रमांकावर राहावा, अशी संघाची इच्छा आहे. पण जर पाकिस्तानने विजय मिळवला, तर भारत टॉपवर राहू शकणार नाही.

या सामन्यात सूर्याकुमारवरही मोठा दबाव असेल, कारण पाकिस्तानविरुद्ध तो पहिल्यांदाच कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. भारतीय संघ पराभूत झाला, तर आत्मविश्वासालाही मोठा धक्का बसेल.

Comments are closed.