वीरेंद्र सेहवाग नसता, तर कसोटी क्रिकेटच संपलं असतं, विवियन रिचर्ड्स यांनी सांगितला खास किस्सा

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जात आहे. (11 ऑक्टोबर) रोजी सामन्याचा दुसरा दिवस संपला. दुसऱ्या दिवशीही भारताने आपली पकड कायम ठेवली. हा सामना पाहण्यासाठी वेस्ट इंडिजचे दोन माजी महान फलंदाज सर विव्हियन रिचर्ड्स आणि ब्रायन लारा येथे आले होते. दोघांनीही सामन्याचा आनंद घेतला. या दरम्यान विव्हियन रिचर्ड्स यांनी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघ (DDCA) चे डायरेक्टर श्याम शर्मा यांच्याशी भारतीय क्रिकेटवर चर्चा केली.

श्याम शर्मा सोबतच्या संवादात विव्हियन रिचर्ड्स यांनी वीरेंद्र सहवागचे जोरदार कौतुक केले. रिचर्ड्स म्हणाले की, सहवागमध्ये मला माझीच झलक दिसत होती. मला शाहिद अफरीदी आणि एडम गिलक्रिस्टपेक्षा ही वीरेंद्र सहवागच जास्त धोकादायक वाटायचे. सहवागची फलंदाजी पाहण्यासाठी मी सकाळी 3 वाजता उठायचो. कसोटी क्रिकेट सामन्याच्या मार्गावरती होते, पण वीरेंद्र सहवागने ते पुन्हा जिवंत केले. जेव्हा वीरेंद्र सहवागने कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून लोकांमध्ये या फॉरमॅटची पुन्हा आवड दिसू लागली. आज जर वेस्ट इंडिजसारख्या कमकुवत संघाला पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियममध्ये 15-20 हजार चाहते उपस्थित असतील, तर त्यामागेही सहवागचे मोठे योगदान आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्ती नंतर शुबमन गिल भारतीय संघाचा कसोटी कर्णधार आहे. त्याच्या कर्णधारपणाबद्दल आणि सध्याच्या भारतीय संघाच्या स्थितीबद्दल बोलताना रिचर्ड्स यांनी सांगितले की, शुबमनने मागील 4-5 वर्षांत ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे, त्यावरून मला ठाऊक होते की हा मुलगा भारतासाठी सर्व तीन फॉरमॅट खेळेल. भारतीय संघ सध्या जगावर वर्चस्व गाजवत आहे. भारत दोन संघ तयार करू शकतो. या दरम्यान रिचर्ड्स यांनी यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शनबद्दलही बोलले. त्यांचे मत आहे की दोन्ही खेळाडू खूप मजबूत आहेत. इतक्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही जयस्वालला टी-20 फॉरमॅटमध्ये संधी मिळत नाही, कारण भारतात स्पर्धा खूप आहे. याशिवाय त्यांनी कुलदीप यादव आणि मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांचेही जोरदार कौतुक केले. कुलदीपबद्दल तर त्यांनी सांगितले की सध्या तो जगातील सर्वात मोठा फिरकी गोलंदाज आहे.

Comments are closed.