असं झालं तर… विमान तिकिटाचा रिफंड न मिळाल्यास…

सध्या इंडिगो एअरलाईनच्या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. बऱ्याच जणांना तिकिटाचे पैसेही रिफंड मिळाले नाहीत.

जर विमानाने प्रवास करताना तिकिटाचे पैसे रिफंड मिळाले नाहीत किंवा उशीर झाला तर काय करावेहे अनेकांना कळत नाही. असं काही झालं तर काही गोष्टी फॉलो करा.

एअरलाईनच्या वेबसाईट किंवा अॅपवर किंवा फोनद्वारे ग्राहक सेवा पेंद्राशी संपर्क साधा. त्यांना बुकिंग रेफरन्स नंबर, फ्लाईट नंबर, प्रवास रद्द केल्याची तारीख सांगा.

जर तुम्ही मेक माय ट्रिप, गोइबिबो यांसारख्या एजन्सीमार्फत तिकीट बुक केले असेल तर त्या एजन्सीमार्फत रिफंडची मागणी करा. त्यानंतर तुमच्या खात्यात रिफंड येईल.

जर स्वतः हून तुमची फ्लाईट चुकली असेल तर तुम्हाला रिफंड मिळणार नाही. एअरलाईनने फ्लाईट रद्द केल्यास नियमाप्रमाणे 48 तासांच्या आत रिफंड मिळण्याची तरतूद आहे.

Comments are closed.