त्यांना अपडेट देणे माझी जबाबदारी नाही, मोहम्मद शमीचा निवडकर्त्यांवर संताप!
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohmmed Shami) ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यात संघात न घेतल्याबद्दल निवडकर्त्यांवर निशाणा साधला आहे.
शमी गेल्या काही काळापासून भारतीय कसोटी संघाचा भाग नाही. त्याने सांगितले की, जर तो 4 दिवसांचा रणजी क्रिकेट खेळू शकतो, तर 50 ओव्हरही सहज खेळू शकतो. शमीने स्पष्ट केले की, त्याचे काम एनसीएमध्ये जाऊन तयारी करणे आणि खेळणे आहे, पण निवडकर्त्यांना अपडेट देणे त्याची जबाबदारी नाही.
शमी म्हणाला की, तो देशासाठी नेहमी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा निवडकर्त्यांना हवे असेल तेव्हा तो खेळण्यासाठी तयार आहे. त्याने सांगितले की, त्याने ऑपरेशन नंतर परत येऊन पूर्ण फिटनेस मिळवली आहे आणि बंगालसाठी खेळण्यात त्याला काही अडचण नाही.
बंगालच्या प्रशिक्षक लक्ष्मी रतन शुक्लाने देखील शमीची फिटनेस आणि परत येण्याची तयारी कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.
Comments are closed.