आयफोन चोरीला गेल्यास नवा मिळणार

ऍपल कंपनीने आयफोन युजर्ससाठी डिव्हाइस प्रोटेक्शन प्रोग्राम अपडेट केला आहे. या नव्या ऍपल केअर प्लस प्लॅनमध्ये आयफोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास कंपनी नवीन आयफोन देणार आहे. त्यामुळे आता आयफोनची सुरक्षितता युजर्सला मिळणार आहे. ऍपलने पहिल्यांदाच हिंदुस्थानात हा प्लॅन आणला आहे. याआधी हा प्लॅन अन्य काही देशांत उपलब्ध होता.
या प्लॅनसाठी ग्राहकांना महिना आणि वार्षिक पेमेंट ऑप्शन मिळणार आहे. ग्राहकांनी हा प्लॅन घेतल्यास त्यांना फोनची सेफ्टी मिळणार आहे. म्हणजे प्लॅन घेतल्यानंतर आयफोन चोरीला गेला किंवा हरवल्यास कंपनी ग्राहकाला नवा कोरा आयफोन देईल. या प्लॅनमध्ये फोनची रिपेयरिंग, 24 तास बॅटरी सर्व्हिस आणि प्रायोरिटी सपोर्ट मिळेल. ऍपलने या प्लान्सला खरेदी आणि मॅनेज करणेही सोपे केले आहे.

Comments are closed.