IIT बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, हॉस्टेल इमारतीवरून उडी घेत जीवन संपवलं

मुंबईच्या आयआयटीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पवईच्या आयआयटी बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी पवई आयआयटी बॉम्बेमध्ये शिक्षण घेत होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री या तरुणाने तिथल्या हॉस्टेल इमारतीवरून उडी घेत जीवन संपवले. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. शिक्षणाच्या तणावामुळे या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. तसेच त्या विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
शिक्षण पद्धतींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे विद्यार्थ्यांचा तणाव वाढताना दिसत आहे. याच वाढत्या शैक्षणिक तणावामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना सातत्याने घडत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे.
Comments are closed.