खारेगावच्या पुलाखाली बोटीचे बेकायदा पार्किंग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई – नाशिक महामार्गावरील खारेगाव पुलाला एक महाकाय बोट धडकल्याचे फोटो प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली. परंतु ही बोट पुलाला धडकलेली नव्हती तर विजया एन्टरप्रायझेस या ठेकेदाराने अँकर टाकून धोकादायक स्थितीत पार्क केली होती. लाखो वाहनांच्या वर्दळीच्या पुलाखाली बोट नांगरता येते का? सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. भरती-ओहोटी जोरात येते. खाडीतील पाणी वाढले आणि बोटीमुळे पुलाला धोका पोहचला तर कोण जबाबदार, असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला तेव्हा मात्र ते निरुत्तर झाले.

Comments are closed.