गुजराती तरुणाला अमेरिकेत 10 वर्षांचा तुरुंगवास
गुजरातमधील एका तरुणाला अमेरिकेत अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. कवणकुमार पटेल असे आरोपीचे नाव असून तो अमेरिकेत बेकायदेशीर राहत होता. तसेच एका हॉटेलात काम करत होता, असे समोर आले आहे.
कवणकुमार नेब्रास्का येथील ओमाहामधील हॉटेलमध्ये काम करत होता आणि त्याने गेल्या वर्षी जानेवारीत या मुलीवर अत्याचार केला. या दोन अल्पवयीन मुलींनी सांगितले की, तस्करांनी त्यांना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले होते, जेणेकरून हॉटेलच्या खोलीचे भाडे कमी केले जाईल. तसे न केल्यास त्यांना हॉटेलमधून हाकलून देण्याची धमकी दिली होती.
Comments are closed.