आजारपण अन् मानसिकरित्या त्रास; तरुणीने स्वतः अंगावर…; पंढरपुरातील ॲसिड प्रकरणाला नवं वळण, पोल
पंढरपूर : पंढरपूर शहरात काल (रविवारी, ता १२) रात्री आठच्या सुमारास एका तरुणीवर ॲसिड हल्ला (Pandharpur Crime News) झाल्याचे घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर या तरुणीला उपचारासाठी शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर डॉक्टर मंजुषा देशमुख यांनी या तरुणीच्या डोळ्यात गेलेले ॲसिड बाहेर काढण्यात यश मिळवले होते. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर सर्व सीसीटीव्ही आणि इतर जबाब घेतल्यानंतर, सखोल चौकशी केल्यानंतर त्यामध्ये एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.(Pandharpur Crime News)
या घटनेत हल्ला झालेला तरुणी लिव्हर आणि इतर आजाराने त्रस्त होती आणि यातूनच तिने वैतागून स्वतःवर ॲसिड टाकून घेतल्याची प्राथमिक माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली आहे. आता या तरुणीने ज्या दुकानातून हे ॲसिड घेतले त्याची तपासणी पोलीस करीत असून सध्या तरी या तरुणीने आपण स्वतःवरच हे ॲसिड ओतून घेतल्याची कबुली तिच्या आई देखत पोलिसांना दिली आहे. याबाबत पुढचा तपास पोलीस करीत असून या प्रकाराने ॲसिड प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे.(Pandharpur Crime News)
पंढरपुरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक, प्रशांत डगळे यांनी या घटनेप्रकरणी माहिती देताना सांगितलं की, घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची कसून तपासणी केली. तसेच पीडित तरुणीचे जबाब नोंदवले. मात्र, तिने दिलेल्या जबाबातील विसंगती आणि सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद हालचाली न आढळल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, अखेर त्या मुलीने स्वतःच हा बनाव रचल्याची कबुली दिली.(Pandharpur Crime News)
Pandharpur Crime News: तिने स्वतःच हा ॲसिड हल्ल्याचा बनाव रचल्याचे समोर
सहाय्यक पोलीस अधीक्षक, प्रशांत डगळे यांनी माहिती देताना सांगितलं की, या घटनेबाबत काल आम्हाला पिडीत तरूणी आणि तिच्या आईने आम्हाला तिच्यावरती अज्ञाताने ॲसिड हल्ला केला असल्याचं सांगितलं, घटनेनंतर तरूणीला रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होते, त्यानंतर आम्ही तपास केला, परिसरातील सीसीटिव्ही तपासले त्यानंतर जबाब नोंदवले, यावेळी आम्हाला तरूणीच्या जबाबात तफावत आढळली, त्यानंतर तिने स्वतःच हा ॲसिड हल्ल्याचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. चौकशीत ही सर्व माहिती समोर आली आहे, तिने आपल्या उजव्या बाजुला चेहऱ्यावर हे ॲसिड टाकला. ६० रूपयांना हे ॲसिड कोणत्याही दुकांनामध्ये मिळत आपण ते बाथरूम टॉयलेट धुण्यासाठी वापरतो. ते तिने एका दुकानातून विकत घेतलं, आणि जिथे सीसीटीव्ही नाही, रहदारी नाही, गल्लीबोळ आहे, त्या ठिकाणी तिने स्वतःच अंगावर ओतून घेतलं.
निर्भया पथकाच्या पीएसआय, पिडीतेची आई, रूग्णालयातील डॉक्टर, यांच्यासमोर तरूणीचे व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. त्यामध्ये पिडीता सांगते की, ती आजारी होती, तिला काही वर्षांपासून लिव्हरचा आजार आहे. अनेक वेगवेगळ्या डॉक्टरांकडे तिच्यावरती उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिच्या घरातील लोकांनी तिला दिलेले टोमणे आणि इतर गोष्टींना तिने कंटाळून हे केलेलं असल्याचं तिने सर्वासमोर सांगितलं आहे. आईने देखील यावर सहमती दाखवली आहे, तिला मेटंली त्रास होत होता. तीची प्रकृती स्थिर आहे. ॲसिड तिच्या डोळ्यात गेलं होतं, पण तिच्या शरीरावरती काही जखमा नाहीत, डॉक्टरांचे रिपोर्ट घेणे बाकी आहे, काल आठ वाजता माहिती मिळाली, काहींना चौकशीसाठी बोलावलं होतं, बाकी तपास सुरू आहे, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
Pandharpur Crime News: नेमका काय आहे प्रकार?
प्राथमिक माहितीनुसार, हा सर्व प्रकार घरगुती वादातून आणि वैयक्तिक कारणातून घडला आहे. या तरुणीने स्वतःच घरातील टॉयलेट साफ करण्याचे ॲसिड घेतले आणि एका अंधाऱ्या ठिकाणी जाऊन ते स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. त्यानंतर आपल्यावर अज्ञाताने ॲसिड हल्ला केल्याचा बनाव तिने रचला होता.(Pandharpur Crime News)
आणखी वाचा
Comments are closed.