IND vs ENG: ‘मी लालची नाही', हॅरी ब्रूकला रिषभ पंतचा खडसावणारा टोला
भारतीय संघाचा उपकर्णधार रिषभ पंतने (Team india’s Vice captain Rishbh Pant) पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अतिशय शानदार फलंदाजी केली आहे. पंतच्या आक्रमक खेळीमुळे इंग्लंडच्या संघामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळेच इंग्लंडचे खेळाडू पंतसोबत शब्दाने छेडछाड करताना दिसले. दुसऱ्या डावात पंत जेव्हा फलंदाजी करत होता, तेव्हा हॅरी ब्रूकने (Harry Brook) त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. त्याला भारतीय यष्टिरक्षक रिषभ पंतने चांगलंच उत्तर दिलं.
रिषभ पंत (Rishbh Pant) फलंदाजी करत असताना हॅरी ब्रूक स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी त्याने पंतला विचारलं की, तुझं कसोटीतलं सर्वात वेगवान शतक किती चेंडूंमध्ये झालं आहे? त्यावर पंतने सांगितलं, 80 ते 90 चेंडूंमध्ये असेल. त्यावर ब्रूकने म्हटलं, माझं 55 चेंडूंमध्ये झालं आहे, आज त्याचा रेकॉर्ड मोडून टाक.
त्यावर पंतने ब्रूकला ठणकावून उत्तर दिलं, मी रेकॉर्डसाठी लालची नाही. खेळता-खेळता झालं तर ठीक आहे. पंतचं हे उत्तर ऐकून जेमी स्मिथ (Jemi Smith & Harry Brook) आणि ब्रूक दोघांचेही चेहरे उतरले.
Comments are closed.