दिवाळीत पावसाची आतषबाजी! रायगड, नवी मुंबई, ठाण्यात वीज आणि ढगांच्या गडगडाटासह तुफान पाऊस
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने मुंबई, ठाण्यासह राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. रायगड, सिंधुदुर्गच्या काही भागात, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी वादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
21 ऑक्टोबर, 5.30 pm, प्रखर ते अतिशय तीव्र संवहन वरील भागात दिसून आले #उत्तररायगड, #नवीमुंबई आणि अगदी जवळ #मुंबई #ठाणे #उपनगरे खूप मोड ते तीव्र होण्याची शक्यता #गडगडाटी वादळे पुढील 3.4 तासांत या भागांत गडगडाट ऐकू आला. मुंबईवर फक्त ढगाळ आकाश आहे.
टीसी pic.twitter.com/MwLES6gETk— KS होसाळीकर (@Hosalikar_KS) 21 ऑक्टोबर 2025
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात पुढील पाच वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऐन दिवाळीत पावसाची आतषबाजी सुरू झाल्याने नागरिकांच्या आनंदावर पाणी फेरले आहे. मान्सूनमध्ये झालेल्या नुकसानीतून सावरत असतानाच पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/fxLTuqvhYq
— प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई (@RMC_Mumbai) 21 ऑक्टोबर 2025
21 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
22 ऑक्टोबर : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणामध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
23 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर ,बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोलीत यलो अलर्ट.
24 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत येलो अलर्ट.
25 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, संभाजीनगर, बीड, धाराशिव, संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Comments are closed.