गणेश मंडपाच्या ठिकाणी तातडीने धूर फवारणी करा, समन्वय समितीची मागणी

मुंबईत अतिवृष्टीमुळे अनेक गणेश मंडळांच्या परिसरात पाणी साचले तसेच चिखल झाला आहे. यामुळे डास पैदास आणि साथीचे रोग पसरू नये म्हणून पालिकेने तातडीने अशा ठिकाणी धूर, साथरोग प्रतिबंधक फवारणी करण्याची मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. समितीच्या पत्रावर आयुक्तांनी तत्काळ कार्यवाही करावी, अशी विनंती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी केली आहे.

Comments are closed.