पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्क रद्द
प्लास्टीक, वस्त्रप्रावरणे, वाहन उद्योगाला लाभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने 40 अतिमहत्वाच्या पेट्रोकेमिकल्स उत्पादनांवरील आयात शुल्क पूर्णत: काढून टाकले आहे. याचा लाभ या पदार्थांपासून भारतात प्लॅस्टिक, वस्त्रप्रावरणे आणि वाहनांचे भाग बनविणाऱ्या उद्योगांना होणार आहे. ही सवलत 30 जून 2026 पर्यंत लागू राहणार आहे. सध्याची युद्धाची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
मध्यपूर्वेत संघर्ष होतच आहे. त्यामुळे महत्वाच्या पेट्रोकेमिकल्स उत्पादनांच्या पुरवठा साखळीत मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे. काही उत्पादनांच्या किमती वाडल्याही आहेत. भारताला मोठ्या प्रमाणात हे पदार्थ आयात करावे लागतात. त्यामुळे भारतातील उद्योगांवर अधिक आर्थिक भार पडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्याचे स्वागत या क्षेत्रातील उद्योगांकडून करण्यात येत आहे.
महत्वाचा निर्णय
केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय परिस्थिती वेळीच ओळखून योग्य वेळी हा निर्णय घेतला आहे. यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीला काही प्रमाणात तोटा सहन करावा लागणार असला, तरी उद्योगांवरही भार कमी होणार आहे. या क्षेत्रांमध्ये भारतात छेटे आणि मध्यम उद्योगही मोठ्या संख्येने आहेत. त्यांचा लाभ निश्चित आहे.
काय होणार परिणाम…
ड प्लॅस्टीक, पॅकेजिंग, वस्त्रप्रावरणे, कपडे, औषधे, रसानये, वाहनांचे सुटे भाग यांच्या उद्योगांना सर्वाधिक लाभ होण्याची शक्यता. सुविधा मिळणार
ड गुंतवणुकीचा खर्च कमी झाल्याने अंतिम उत्पादनांच्या किमती स्थिर राहणार. यामुळे या उत्पादनाच्या ग्राहकांची महागाईपासून मुक्तता होणार
कोणत्या मालावर कर हटविला
रासायनिक पदार्थ
ड अॅनहायड्रस अमोनिया, मेथेनॉल, टोल्युइन, स्टायरीन, व्हिनाईल क्लोराईड, मोनोमर्स, मोनाएथिलीन ग्लायकॉल, फिनॉल्स, अॅसिटीक अॅसिड
विशेष रसायने
ड अॅपॉक्झी रेझिन, पॉलीयुरेथेन, फॉर्मालल्डिहाईड आणि त्याचे डेरिव्हेटिव्हज्, पॉलीओल्स आणि त्यासंबंधीची उपयुक्त आणि महत्वाची उत्पादने
कोणती उत्पादने सवलतीच्या बाहेर
ड पॉलीथिन, पॉलीप्रोपेलीन, पीव्हीसी, पीईटी, आणि पीईटी चिप्स, एबीएस, पॉलिकार्बोनेट आणि इतर प्रकारांमधील अभियांत्रिकी प्लॅस्टिक्स
पेट्रोकेमिकल इंटरमिजिएटस् म्हणजे काय…
कच्चे इंधन तेल आणि नैसर्गिक इंधन वायू या मूळ पदार्थांना उर्ध्वपतीत करुन इंटरमिजिएटस् बनविली जातात. या उत्पादनांचा थेट उपयोग करता येत नाही. मात्र, या उत्पादनांपासून अंतिम आणि ग्राहकोपयोगी उत्पादने बनविली जातात. या उत्पादनांच्या पासून कृत्रिम धागे. प्लास्टिक, रंग आणि औषधे बनविली जातात.
Comments are closed.