पुतिन-ट्रम्प भेटीमुळे हिंदुस्थान गॅसवर; अमेरिका-रशिया संबंध सुधारल्यास टेन्शन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. ट्रम्प हे रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर पुढील आठवडय़ात ट्रम्प, पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियाचे संबंध सुधारले तर टेन्शन वाढणार असून पुढील आठवडय़ात होणाऱया बैठकीपर्यंत हिंदुस्थानवर गॅसवर असेल.
ट्रम्प, पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यातील चर्चेत युद्धावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. हा तोडगा निघाल्यास अमेरिका आणि रशियाचे संबंध सुधारण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत रशियाशी असलेले संबंध टिकवून ठेवण्यासाठी हिंदुस्थानची कसरत होणार आहे. तसेच पूर्वी पाकिस्तानविरोधात रशियाकडून हिंदुस्थानला पाठिंबा मिळत होता. मात्र, अमेरिका आणि रशियाचे संबंध सुधारल्यास रशिया पाकिस्तानविरोधात हिंदुस्थानची साथ देईल का याबाबत शंका आहे.
Comments are closed.