पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी 'या' भागातील पाणीपुरवठा ३० ऑक्टोबरला बंद, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

पुणे न्यूज : पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सध्याची सर्वात महत्वाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी म्हणजे उद्या 30 ऑक्टोबर 2025 रोजी पुण्यातील काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पुण्यात विविध विकासकामे सुरू आहेत. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शहरात ठिकठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत.

शहरात अनेक रस्त्यांची आणि मेट्रोची कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांनाही काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण मेट्रोच्या कामामुळे पिंपरी चिंचवडमधील जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यामुळे सर्वसामान्यांची तात्पुरती गैरसोय होणार आहे.

त्याचबरोबर पुण्यातील जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील काही भागातील पाणीपुरवठा उद्या 30 ऑक्टोबर रोजी खंडित होणार असल्याचे प्रशासनाने उघड केले आहे.

पार्वती जलकेंद्र ते लष्कर पाणीपुरवठा केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीतील गळतीची दुरुस्ती करायची असल्याने पुण्यातील काही भागातील पाणीपुरवठा ३० ऑक्टोबर रोजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

त्याचबरोबर निगडी परिसरातील मेट्रोच्या कामाशी संबंधित जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे असून ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने उद्यापासून पिंपरी चिंचवडमधील काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोणत्या भागात बंद राहणार याची माहिती पाहू.

पुण्यातील या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे

Ramtekdi Industrial Area, Syednagar, Havenpark, Shankar Math, Vaiduvadi, Ramnagar, Anandnagar, Hadapsar Gavthan, Satavwadi, Ganaglenagar, Sasanenagar, Kalepadal, Mundhwa, Malwadi, Solapur Road, B.T. Kavade Road, Bhimnagar, Koregaon Park, Orient Garden, Mahamadwadi Road Right Entire Portion, Fursungi, Uruli Devachi, Bhekrainagar, Mantarwadi, Baker Hill Tank, Kharadi Portion, Apan House,

भणगाई वस्ती, चौधरी वस्ती, एकनाथ पठारे नगर, सातव वस्ती, थिटे वस्ती, चंदननगर, बोराटेनगर, यशवंतनगर, तुकाराम नगर, वडगाव शेरी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, माटेनगर, माळवाडी, महावीरनगर, शेकाबी पार्क, विद्यानगर नगर, विद्यानगर वस्ती, गावठाणनगर, वडगाव शेरी. मारुतीनगर, घरकुल सोसायटी, टेम्पो चौक, पोटेनगर, विद्यानगर, मुरलीधर सोसायटी.

पिंपरी चिंचवडमधील कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

चिखलीतील नेहरूनगर, संत तुकारामनगर, महेशनगर, गंगानगर, वल्लभनगर, कासारवाडी, फुगेवाडी तसेच हरगुडे वस्ती, पवार वस्ती, कुदळवाडी, जाधववाडी.

Comments are closed.