'या' फलंदाजाचं शतक म्हणजे भारताचा विजय पक्का! लीड्समध्येही चालणार का हा फॉर्म्युला?
भारत वि इंग्लंड कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांच्या मालिकेची कसोटी मालिकेची सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना सध्या लीड्समध्ये रंगला आहे. लीड्स कसोटीत 3 दिवसांचा खेळ पूर्ण झाला असून चौथ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. सध्या तरी हे स्पष्ट नाही की सामना नेमका कोणत्या बाजूने झुकतोय, पण एका भारतीय फलंदाजाच्या शतकाने भारतीय संघाला नक्कीच दिलासा दिला असेल. कारण जेव्हा-जेव्हा या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे, तेव्हा-तेव्हा भारताने सामना जिंकलेलाच आहे. त्याचे शतक म्हणजे विजयाची हमी असे म्हणायला हरकत नाही. (Jaiswal hundred win guarantee)
या खेळाडूचे नाव आहे यशस्वी जयस्वाल. त्याची कसोटी कारकिर्द अजून खूपच छोटी असला तरी त्याने अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. जयस्वालने आतापर्यंत 5 कसोटी शतके झळकावली आहेत आणि प्रत्येक वेळी भारताने तो सामना जिंकला आहे. (Yashasvi Jaiswal Test century)
जयस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात 2023 साली वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. त्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने 171 धावांची शानदार खेळी केली होती. भारताने तो सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. दुसरं शतक त्याने 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध झळकावलं, तेही शतक नव्हे तर थेट दुहेरी शतक 209 धावा. भारताने तो सामना 106 धावांनी जिंकला. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच पुढच्या सामन्यात दुसऱ्या डावात त्याने 214 नाबाद धावा केल्या आणि भारताने तो सामना तब्बल 434 धावांनी जिंकला. (Yashasvi Jaiswal century record)
जयस्वालने त्याचं चौथं शतक नोव्हेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियात ठोकलं. भारत दौऱ्यावर होता आणि पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने 161 धावा केल्या. तो सामना भारताने 295 धावांनी जिंकला. त्या नंतर मात्र त्या मालिकेत त्याचं फारसं यशस्वी योगदान नव्हतं आणि भारतालाही पुढे सामना जिंकता आला नाही. (Yashasvi Jaiswal century record)
आता पुन्हा एकदा जयस्वालने इंग्लंडच्या भूमीवरच शतक झळकावलं आहे. त्याने 159 चेंडूंमध्ये 101 धावांची खेळी केली आहे. या खेळीत 16 चौकारांसह 1 षटकार लगावला होता. आता पाहावं लागेल की त्याच्या शतकासोबत जोडलेली भारताच्या विजयाची परंपरा लीड्समध्येही टिकते का, की यावेळी ती संपते. (Jaiswal hundred at Leeds)
Comments are closed.