धक्कादायक! चौथी मुलगी झाल्याचा राग, पित्यानंच संपवलं पोटच्या मुलीला, जामनेर हादरलं

जळगाव क्राईम न्यूज: जळगाव जिह्यातील जामनेर तालुक्यातील मोराड गावात धक्कादायक घटना घडली आहे. तीन दिवसांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान जळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, त्यानंतर, पित्यानेच पोटच्या चिमुकलीची खून करण्यात आल्याचा उलगडा झाला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर तपासात सत्य समोर आल्यानंतर पोलीसही अचंबित झाले आहेत. कृष्णा राठोड असे अटक करण्यात आलेल्या निर्दयी पित्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

चौथी मुलगी झाल्याच्या रागातून पित्यानेच तीन दिवसांच्या पोटच्या मुलीची केली हत्या

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोराड गावात चौथी मुलगी झाल्याच्या रागातून पित्यानेच तीन दिवसांच्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली होती. सुरुवातीला कुटुंबीयांनी आंघोळ करताना मुलगी पडून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यानुसार पहूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला होता. चिमुकलीला उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, उपचारादरम्यान 14 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला होता. दीड महिन्यांनी वैद्यकीय अहवालात मुलीचा मृत्यू अपघाती नसून ठणक वस्तूच्या मारामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला. तपासादरम्यान कृष्णा लालचंद राठोड या पित्यानेच चौथी मुलगी झाल्याच्या रागातून हत्या केल्याची कबुली दिली.

पहूर पोलिसांनी कृष्णा राठोड याला अटक करून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला

या प्रकरणी पहूर पोलिसांनी कृष्णा राठोड याला अटक करून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून समाजमन सुन्न झाले आहे.

महत्वाच्या बातम्या:

मंगेश काळोखे हत्या प्रकरण! राष्ट्रवादीच्या सुधाकर घारेंना अटक करा, खोपोलीत पोलीस आणि जमावामध्ये धक्काबुक्की

आणखी वाचा

Comments are closed.