Bangladesh Violence – आणखी एका हिंदू तरुणाची गोळ्या झाडून हत्या, बांगलादेशात वातावरण चिघळलं

बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेले अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. हिंदूंवरील अत्याचाराचे थरकाप उडवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापूर्वी दोन हिंदू तरुणांची हत्या करण्यात आली होती. या घटना ताज्या असतानाच आता आणखी एका हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मागील 10 दिवसांमध्ये तीन हिंदू तरुणांचा खून करण्यात आल्याने बांगलादेशातील हिंदू दहशतीखाली आहेत.
बांगलादेशातील मयमनसिंग शहरातील भालुका येथील कपड्यांच्या कारखान्यामध्ये सदर घटना घडली आहे. 42 वर्षीय बजेंद्र बिस्वास याची त्याच्याच सहकाऱ्याने गोळी घालून हत्या केली. यापूर्वी ढाक्याजवळच्या एका गारमेंटमध्ये दीपू चंद्र दास याची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर अमृत मोंडाल ऊर्फ सम्राट याची गावकऱ्यांनी हत्या केली होती.
बांगलादेशात 5 हिंदूंची घरे जाळली, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर घटना उघडकीस

Comments are closed.