In Sindhudurg a hotel owner and 5 to 6 other people tied a tourist with a rope and beat him up brutally


पुण्यातून गोव्याकडे जाणारा मित्रांचा एक ग्रुप झाराप झिरो पॉईंट येथील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबला होता. यावेळी चहाच्या कपात माशी पडल्याचे पर्यटकाच्या लक्षात आले. त्याने ही बाब हॉटेल मालकाच्या लक्षात आणून दिली. मात्र यानंतर झालेल्या वादावादीत हॉटेल मालकासह अन्य 5-6 जणांनी त्या पर्यटकाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली.

कुडाळ : झाराप झिरो पॉईंट येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या पर्यटकाला बेदम मारहाण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पुण्यातून गोव्याकडे जाणारा मित्रांचा एक ग्रुप झाराप झिरो पॉईंट येथील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबला होता. यावेळी चहाच्या कपात माशी पडल्याचे पर्यटकाच्या लक्षात आले. त्याने ही बाब हॉटेल मालकाच्या लक्षात आणून दिली. मात्र यानंतर झालेल्या वादावादीत हॉटेल मालकासह अन्य 5-6 जणांनी त्या पर्यटकाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. याप्रकरणी सहा जणांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (In Sindhudurg a hotel owner and 5 to 6 other people tied a tourist with a rope and beat him up brutally)

कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिलेल्या माहीती नुसार, रुपेश बबन सपकाळ (वय-33 वर्षे रा. कात्रज, जिल्हा-पुणे) हे आपल्या मित्रांसह गोव्याला जात होते. काल ते झाराप झिरो पॉईंट येथे चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी चहाच्या एका कपात माशी पडलेली रुपेश सकपाळ यांना दिसली. त्यांनी ती बाब हॉटेल मालक तथा आरोपी क्रमांक 1 तनवीर करामत शेख यांच्या निदर्शनाला आणली आणि चहा बदलून देण्यास सांगितले. पण चहा बदलून मिळाला नाही. त्यामुळे माशी पडलेल्या चहाचे पैसे देणार नाही असे सपकाळ यांनी सांगताच तन्वीर शेख याला राग आला. यानंतर त्याने आपल्या साथीदारांसह रुपेश सपकाळ यांना दोरीने बांधून काठीने व हाताच्या ठोशांनी मारहाण केली. यानंतर रुपेश सकपाळ यांचे कपडे फाडले व त्यांचे हातपाय दोरीने बांधून ठेवण्यात आले. तसेच रुपेश सकपाळ यांच्यासोबत असलेल्या संजय चव्हाण यालाही मारहाण केली.

हेही वाचा – Ladki Bahin : पडताळणीच्या धास्तीने जानेवारीत इतक्या लाडक्या बहिणींची माघार, वाचा सविस्तर

दरम्यान, त्याठिकाणी उपस्थित काही पर्यटकांनी 112 नंबरवरून कुडाळ पोलीस ठाण्यात संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना रुपेश सपकाळ हे दोरीने बांधलेल्या स्थितीत आढळले. यानंतर रुपेश सपकाळ यांच्यासह त्यांना मारहाण करणाऱ्या सर्वांना कुडाळ येथे आणण्यात आले. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई योगेश मुंढे यांनी कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर तनवीर करामत शेख, शराफत अब्बास शेख (वय-57), अब्बास उर्फ साहिल शराफत शेख (वय-18), परवीन शराफत शेख (वय-42), साजमीन शराफत शेख (वय -19) आणि तलाह करामत शेख (वय-26) (सर्व रा.-झाराप खान मोहल्ला, ता-कुडाळ) यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम -115(2), 189(2), 126(2), 191(2) 190, 118 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर हे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा – Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं नाही, आम्ही ठाकरेंसोबतच राहणार – अरविंद सावंत



Source link

Comments are closed.