300व्या वनडे सामन्यात धमाकेदार कामगिरी करणारे 3 भारतीय! विराट कोहलीही घालणार धुमाकूळ?

सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (ICC Champions Trophy 2025) भारतीय संघ धमाकेदार कामगिरी करत आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. आता भारतीय संघ रविवारी (2 मार्च) न्यूझीलंडविरुद्ध आपला पुढचा सामना खेळेल, जो दिग्गज विराट कोहलीसाठी (Virat Kohli) खूप खास असेल. खरंतर, हा विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील 300वा सामना असेल. हा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरताच, विराट कोहली त्याच्या कारकिर्दीत 300 सामने खेळणारा 7वा भारतीय खेळाडू बनेल.

विराट कोहली व्यतिरिक्त, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), मोहम्मद अझरुद्दीन (Mohammed Azharuddin), राहुल द्रविड (Rahul Dravid), सौरव गांगुली (Sourav Ganguly), युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांनी ही कामगिरी केली आहे. त्यांचा 300वा वनडे सामना या सर्व खेळाडूंसाठी खूप खास होता. या बातमीद्वारे आपण त्या 3 भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेऊया ज्यांनी त्यांच्या 300व्या वनडे सामन्यात शानदार कामगिरी केली आहे.

1) राहुल द्रविड- 2006च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये राहुल द्रविडने त्याचा 300वा वनडे सामना खेळला, ज्यामध्ये त्याने संघाचे नेतृत्वही केले. द्रविडने मोहाली येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्याचा 300वा वनडे सामना खेळला. या सामन्यात द्रविडने 63 चेंडूत 52 धावा केल्या आणि तो संघासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. द्रविडच्या या खेळीचा संघाला काही फायदा झाला नाही, ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला.

२) सौरव गंगुली- 2007 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेच्या मध्यभागी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपला 300वा वनडे सामना खेळला. लीड्समध्ये झालेल्या या सामन्यात माजी डावखुरा फलंदाज गांगुलीने गोलंदाजांना चांगलेच झोडपले होते. त्याने 79 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 59 धावा केल्या. दरम्यान भारतीय संघ डीएलएस नियमानुसार हा सामना 38 धावांनी जिंकण्यात यशस्वी झाला.

3) एमएस धोनी- भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने 31 ऑगस्ट 2017 रोजी श्रीलंकेविरुद्ध त्याच्या वनडे कारकिर्दीतील 300वा सामना खेळला. कर्णधारपद सोडल्यानंतर लगेचच धोनीने ही कामगिरी केली. आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 168 धावांनी पराभव केला. यामध्ये एमएस धोनीचेही महत्त्वाचे योगदान होते. त्याने 42 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 49 धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी शानदार शतकी खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेट सोडलं पण पैसा नाही! इरफान पठाणच्या कमाईचा भन्नाट फॉर्म्युला

रणजी फायनलमध्ये करुण नायरचा जलवा, दमदार शतकाने विदर्भ जेतेपदाच्या उंबरठ्यावर!

क्षिण आफ्रिकेची विजयी झेप! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 उपांत्य फेरीत दणदणीत प्रवेश

Comments are closed.