आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने डी कॉकसह 'या' पाच खेळाडूंना केले सामील, जाणून घ्या पूर्ण स्क्वॉड

इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या हंगामासाठी काल, (16 डिसेंबर 2025) रोजी अबू धाबी येथील एतिहाद एरीनामध्ये ‘मिनी ऑक्शन’ पार पडले. या लिलावात मुंबई इंडियन्स सर्वात कमी रक्कम घेऊन उतरली होती. मुंबई इंडियन्सने लिलावापूर्वीच रिटेंशनच्या काळात ट्रेडिंगच्या माध्यमातून आपला संघ तयार करण्यावर भर दिला होता. अनेकदा लिलावादरम्यान नियोजनानुसार खेळाडू मिळत नाहीत. हे लक्षात घेऊन मुंबईने एक नवीन मार्ग अवलंबला आणि अनेक खेळाडूंना ट्रेडद्वारे कमी किमतीत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. याद्वारे आपल्या संघातील उणिवा भरून काढण्यात मुंबईला मोठ्या प्रमाणात यश आले आहे.

आयपीएल 2026 च्या लिलावात सर्वात कमी रक्कम सोबत घेऊन उतरलेली मुंबई इंडियन्सची टीम 5 खेळाडूंना आपल्या संघात सामील करण्यात यशस्वी ठरली. आपला 25 खेळाडूंचा ताफा पूर्ण करण्यासाठी मुंबईला एका परदेशी खेळाडूसह एकूण पाच खेळाडूंची गरज होती. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डिकॉकला मुंबईने 1 कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात घेतले. त्यासोबतच दानिश मालेवार (30 लाख), युवा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इजहार (30 लाख), अष्टपैलू खेळाडू अथर्व अंकोलेकर (30 लाख) आणि अष्टपैलू मयंक रावत (30 लाख) या चार युवा भारतीय खेळाडूंना त्यांच्या मूळ किमतीत संघात स्थान मिळाले. अशा प्रकारे 25 खेळाडूंचा स्क्वॉड पूर्ण केल्यानंतरही मुंबई इंडियन्सच्या खात्यात 55 लाख रुपये शिल्लक राहिले आहेत.

मुंबई इंडियन्सने ट्रेड विंडोचा वापर करून अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर आणि शेरफेन रदरफोर्ड यांना आपल्या संघात सामील केले. शार्दुलला मुंबईने लखनौ सुपर जायंट्सकडून 2 कोटी रुपयांत, तर शेरफेन रदरफोर्डला गुजरात टायटन्सकडून 2.6 कोटी रुपयांच्या किमतीत ट्रेड केले. या दोन्ही खेळाडूंसाठी मुंबईने ‘कॅश डील’ केली होती. यानंतर आपल्या संघातील लेग स्पिनरची उणीव भरून काढण्यासाठी मुंबईने मयंक मार्कंडेला कोलकाता नाईट रायडर्सकडून 30 लाख रुपयांच्या किमतीत ट्रेड करून पुन्हा आपल्या ‘पलटन’मध्ये समाविष्ट करून घेतले.

आयपीएल 2026 साठी मुंबई इंडियन्सचा पूर्ण स्क्वॉड:
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, रॉबिन मिंझे, रायन रिक्लेटन, हार्दिक पंड्या (कर्नाधर), नमन धीर, मिचेल सँटनर, विल जॅक, कार्बिन बॉश, राज अंगद बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, दीपक चहर, अश्विनी शर्मा, मार्कन कुमार, मार्कन कुमार, राऊत कुमार, राऊत कडुना ट्रेड), शार्दुल ठाकूर (एलएसजी कडुना ट्रेड), शेरफाने. रदरफोर्ड (जीटी कडुना ट्रेड), क्विंटन डी कॉक (1 कोटी), दानिश मालेवार (30 लाख), मोहम्मद इझार (30 लाख), अथर्व अंकोलेकर (30 लाख) आणि मयंक रावत (30 लाख).

Comments are closed.