आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये 'या' 3 संघांची रचिन रवींद्रवर नजर,कोण लावणार मोठी बोली?
आयपीएल मिनी ऑक्शन जवळ येताच सर्व फ्रँचायझी आपल्या संघातील कमतरतांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अनेक संघांनी कमकुवत प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना रिलीज केले आहे आणि आता त्यांची नजर अशा पर्यायांवर आहे जे पुढील हंगामात सामन्याचे पारडे फिरवू शकतील. या चर्चांमध्ये सर्वाधिक ज्याच्याबद्दल चर्चा रंगत आहे, तो न्यूझीलंडचा तरुण स्टार रचिन रवींद्र आहे.
चेन्नई सुपर किंग्सने आगामी हंगामाआधी घेतलेल्या एका निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तो म्हणजे रचिन रवींद्र, डेवोन कॉनवे आणि मथीशा पथिराना याला रिलीज करणे. रचिनने मागील हंगामात सीएसकेसाठी अनेक प्रसंगी उपयोगी कामगिरी केली होती, पण आता टीम मॅनेजमेंटने त्याला पुन्हा ऑक्शन पूलमध्ये पाठवले आहे.
या रिलीजचा त्याच्या बाजारमूल्यावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. उलट, आता किमान तीन मोठे संघ मिनी ऑक्शनमध्ये रचिनला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी जोरदार स्पर्धा करण्यास तयार दिसत आहेत.
केकेआरने यंदा काही धक्कादायक मोठे बदल केले आहेत. क्विंटन डी कॉक, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल आणि रहमानुल्लाह गुरबाज यांसारख्या मोठ्या नावांना रिलीज केल्यानंतर त्यांच्या पर्समध्ये सुमारे ₹64.30 कोटी रक्कम उपलब्ध आहे.
अशा परिस्थितीत संघाला असा खेळाडू हवा आहे जो पॉवरप्लेमध्ये जलद धावा करू शकेल आणि गरज पडल्यास गोलंदाजीचीही जबाबदारी पार पाडू शकेल. रचिन रवींद्र या दोन्ही भूमिकांसाठी परफेक्ट फिट मानला जात आहे.
केकेआर ओपनिंग स्थिर करण्यासाठी रचिनवर मोठी बोली लावण्यास मागे हटणार नाही, अशी जोरदार शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिल्ली कॅपिटल्ससाठी मागील हंगामातील सर्वात मोठा त्रास म्हणजे स्लो सुरूवात होती. जेक फ्रेझर-मॅकगर्कला वगळता, उर्वरित फलंदाज पॉवरप्लेमध्ये सतत अपयशी ठरले. रचिन रवींद्रची सर्वात मोठी ताकद म्हणजे पॉवरप्लेमध्ये मोठे शॉट्स मारण्याची क्षमता. 26 वर्षीय रवींद्र नवीन चेंडूवर मजबूत फलंदाजीसाठी ओळखले जातात. म्हणूनच, दिली कॅपिटल्सने त्याला आपल्या सुरुवातीच्या फलंदाजीतील समस्येचे निराकरण मानत आहे.
सीएसकेने रचिनला रिलीज केले आहे, पण शक्यता आहे की फ्रँचायझी त्याला कमी किमतीत पुन्हा विकत घेण्याचा प्रयत्न करेल. याची कारणे स्पष्ट आहेत. जडेजा आणि सॅम कुरेनच्या ट्रेडनंतर सीएसकेकडे ऑलराउंडर्सची कमतरता आहे. संघाला असे खेळाडू हवे आहेत जे स्पिन पर्यायासोबत फलंदाजीही मजबूत करू शकतील. अशा परिस्थितीत, रचिन सुपर किंग्ससाठी पुन्हा एक मजबूत दावेदार ठरू शकतात.
Comments are closed.