रवींद्र जडेजाकडे सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी! कोलकाता कसोटीत पहिल्याच डावात करणार ही कामगिरी?
ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Test series in between Team india vs South Africa) भिडण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. शुबमन गिलच्या (Shubman gill under Captaincy) नेतृत्वाखालील भारतीय संघ या सामन्यात दमदार विजयासह मालिकेला विजयी सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. त्याच वेळी, या कोलकाता कसोटीत भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja got the chance to brake sachin tendulkar’s record) महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी मिळणार आहे.
रवींद्र जडेजा हा जगातील सर्वोत्तम अष्टपैलूंमध्ये मानला जातो. तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात सातत्याने उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो. ईडन गार्डन्सच्या मैदानावर त्याने आतापर्यंत 3 सामन्यांच्या 6 डावांत 4 बळी घेतले आहेत. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जर त्याने आणखी 2 बळी घेतले, तर तो या मैदानावर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या भारतीयांच्या यादीत सचिन तेंडुलकरला मागे टाकेल.
ईडन गार्डन्सवर तेंडुलकरने 13 कसोट्यांच्या 12 डावांत एकूण 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे जडेजासमोर त्यांना मागे टाकण्याची मोठी संधी आहे. या मैदानावर सचिनचा सर्वोत्तम गोलंदाजी आकडा होता 31 धावांत 3 बळी. तर जडेजाचा सर्वोत्तम आकडा आहे 41 धावांत 3 बळी. ईडन गार्डन्सवर सर्वाधिक कसोटी बळींचा विक्रम मात्र हरभजन सिंगच्या नावावर आहे. त्याने 7 सामन्यांच्या 13 डावांत तब्बल 46 बळी घेतले आहेत.
जडेजाने आतापर्यंत आपल्या कसोटी कारकिर्दीत 87 सामन्यांच्या 169 डावांत 338 बळी मिळवले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका मालिकेत त्याला 350 कसोटी बळी पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे. जर तो या दोन कसोटी सामन्यांत 12 बळी घेतला, तर तो 350 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेणारा भारताचा पाचवा गोलंदाज ठरेल. या यादीत आतापर्यंत अनिल कुंबळे, रवीचंद्रन अश्विन, कपिल देव आणि हरभजन सिंग यांचा समावेश आहे.
Comments are closed.