Asia Cup: प्लेअर ऑफ द टूर्नामेंट! ‘या’ भारतीयाने मागच्या आशिया कपमध्ये केली शानदार कामगिरी
पुढच्या महिन्यापासून आशिया कप 2025 (Asia Cup) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 9 सप्टेंबरला स्पर्धेचा पहिला सामना खेळला जाणार आहे, तर टीम इंडिया (Team india) आपला स्पर्धेतील पहिला सामना 10 सप्टेंबरला खेळेल. मात्र, या स्पर्धेसाठी अजूनपर्यंत भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. रिपोर्टनुसार बीसीसीआय 19 किंवा 20 ऑगस्टला संघ जाहीर करू शकते.
मागच्या वेळी आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये 2023 साली खेळवला गेला होता आणि त्यात भारताने विजेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep yadav) जबरदस्त कामगिरी केली होती.
आशिया कप 2023 (Asia Cup) मध्ये कुलदीप यादव भारतीय संघाचा भाग होता आणि त्याने संपूर्ण स्पर्धेत शानदार गोलंदाजी केली होती. या स्पर्धेत त्याने एकूण 9 विकेट्स घेतल्या. पण, फायनलमध्ये त्याला फक्त 1 षटक टाकण्याची संधी मिळाली आणि त्यात त्याला विकेट मिळाली नाही. तरीसुद्धा, संपूर्ण स्पर्धेतल्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब मिळाला.
आशिया कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका (IND vs SRI) यांच्यात झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अफाट कामगिरी करत श्रीलंकेला केवळ 15.2 षटकांत 50 धावांत गुंडाळले. श्रीलंकेचे 5 फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत, तर 4 खेळाडू दहाच्या पुढे जाऊ शकले नाहीत.
फायनलमध्ये मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) मस्त गोलंदाजी करत 7 षटकांत केवळ 21 धावा देऊन सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. त्याशिवाय हार्दिक पांड्याने (Hardik pandya) 3 आणि जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 1 विकेट घेतली. त्यानंतर भारताने हे छोटं लक्ष्य सहज गाठलं आणि 6.1 षटकांत विना विकेट विजय मिळवला. फायनलमध्ये मोहम्मद सिराजला प्लेअर ऑफ द मॅचचा मान मिळाला.
Comments are closed.