IND vs ENG: संजू सॅमसन-ईशान किशनचा भीमपराक्रम! 19 वर्षांपूर्वीचा युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पाचा मोठा रेकॉर्ड उध्वस्त

टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) च्या सेमीफायनलमध्ये संजू सॅमसन (Sanju Samson and Ishaan kishan)) आणि ईशान किशन या जोडीने 19 वर्षांपूर्वीचा जुना विक्रम मोडीत काढला आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील हा महत्त्वाचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात सॅमसन आणि ईशानमध्ये 97 धावांची भागीदारी झाली, जी टी-20 वर्ल्ड कपच्या नॉकआउट सामन्यातील भारतासाठीची आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. त्यांनी युवराज सिंग (Yuvraj Singh & Robbin uthappa) आणि रॉबिन उथप्पा यांचा विक्रम मोडला आहे.
2007 च्या टी-20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 84 धावांची भागीदारी केली होती. ही भागीदारी अवघ्या 39 चेंडूत झाली होती. त्यानंतर, आता 19 वर्षांनंतर संजू सॅमसन आणि ईशान किशन यांनी 45 चेंडूत 97 धावा जोडून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ईशान किशन 18 चेंडूत 39 धावा करून बाद झाला, तर संजू सॅमसनने इंग्लंडविरुद्ध अवघ्या 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडने टॉस जिंकून भारताला आधी फलंदाजीसाठी बोलावले होते. अभिषेक शर्मा या मोठ्या सामन्यात फ्लॉप ठरला आणि फक्त 9 धावा करून बाद झाला. मात्र, त्यानंतर सॅमसन आणि ईशानच्या तुफानी फटकेबाजीमुळे भारताने पावरप्लेमध्येच 67 धावा केल्या.
संजू सॅमसनने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक ठोकले आहे. याआधी त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात 97 धावांची मॅचविनिंग खेळी खेळली होती. आता सेमीफायनलमध्येही त्याने अर्धशतक झळकावून आपली चमक दाखवली आहे.
Comments are closed.