आंध्रा एज्युकेशन, डॉ. आंबेडकर शाळा विजेते
श्री उद्यान गणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये आंध्रा एज्युकेशन सोसायटी हायस्कूल-वडाळा तर मुलींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय-विक्रोळी शाळांनी विजेतेपद पटकाविले. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेल्या आंध्रा एज्युकेशन विरुद्ध ताराबाई मोडक सेपंडरी इंग्लिश स्कूल-दादर यामधील मुलांचा निर्णायक सामना दोन्ही संघांच्या चौफेर खेळाने रंगला. मध्यंतराला 22-18 अशी घेतलेली आघाडी आंध्रा एज्युकेशन हायस्कूलला अखेर 42-39 असा अंतिम विजय संपादन करताना फायदेशीर ठरली. एनकेईएस हायस्कूल-वडाळा संघाने तृतीय क्रमांक पटकाविताना विनोबा भावे नगर मनपा शाळा-कुर्ला संघाचा 45-37 असा पराभव केला. विजयी संघाचे स्वराज कसबे, सार्थक भायदे चमकले.
Comments are closed.