टॉप 5 कॅच मास्टर्सच्या यादीत श्रीलंका तिसऱ्या स्थानी, तर भारत-पाकिस्तानचे खेळाडू किती? पहा संपूर्ण यादी

आशिया कप फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीपुरता मर्यादित नाही, तर तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचाही मोठा मंच आहे. अनेक वेळा एखाद्या शानदार झेलामुळे किंवा रन-आउटमुळे सामन्याचा निकाल बदलतो. या स्पर्धेत काही खेळाडूंनी आपल्या अफलातून क्षेत्ररक्षण कौशल्याने संघाला अनेक महत्त्वाच्या विजय मिळवून दिले आहेत. आशिया कपमधील सर्वाधिक झेल घेणाऱ्या पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

श्रीलंकेचे दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने या यादीत अव्वल स्थानावर आहेत. 2000 ते 2014 दरम्यान खेळलेल्या 28 सामन्यांमध्ये त्यांनी एकूण 15 झेल घेतले आहेत. जयवर्धने यांच्या तीक्ष्ण नजर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे अनेकदा श्रीलंकेला कठीण प्रसंगातून वाचवण्यात मदत झाली असून संघाच्या विजयात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

पाकिस्तानचे मधल्या फळीतले फलंदाज युनिस खान यांनी 2004 ते 2012 दरम्यान 14 सामने खेळले असून, त्यात त्यांनी तब्बल 14 शानदार झेल घेतले आहेत. म्हणजे जवळजवळ प्रत्येक डावात त्यांनी एक झेल निश्चित पकडला आहे. युनिस यांच्या या क्षेत्ररक्षण कौशल्यामुळे त्यांच्या संघाला प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करण्यात मोठी मदत मिळत होती.

श्रीलंकेचे बॅटिंग ऑलराउंडर अरविंदा डी सिल्वा यांनी 1984 ते 2000 दरम्यान खेळलेल्या 24 सामन्यांमध्ये एकूण 12 झेल घेतले आहेत. सिल्वा यांनी फलंदाजीप्रमाणेच क्षेत्ररक्षणातही आपल्या संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे.

भारतातील टॉप ऑर्डर फलंदाज रोहित शर्मा यांनी 2008 ते 2023 दरम्यान 28 सामन्यांमधून आपले योगदान दिले आहे. या काळात त्यांनी 11 शानदार झेल घेतले आहेत. रोहित यांचे क्षेत्ररक्षण नेहमीच संघासाठी उपयुक्त ठरले असून, अनेकदा सामन्याच्या निर्णायक क्षणी त्याचा परिणाम दिसून आला आहे.

या यादीत श्रीलंकेच्या आणखी एका दिग्गजाचा समावेश आहे आणि ते म्हणजे श्रीलंकन लेगस्पिनर मुथैया मुरलीधरन. त्यांनी 1995 ते 2010 दरम्यान 24 सामन्यांमध्ये 10 झेल घेतले आहेत. मुरलीधरन यांनी केवळ गोलंदाजीतच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही आपल्या कौशल्याने संघाला मजबुती दिली आहे.

Comments are closed.