कर्जाचा भार वाढता वाढे, जगात प्रत्येक व्यक्तीवर 11 लाखांचे कर्ज
जगातील प्रत्येक देशावरचं कर्ज वाढत असून जगातील प्रत्येक व्यक्तीवर सरासरी 11 लाख रुपयांचं कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. एका अहवालानुसार, जगाचे एकूण कर्ज 102 ट्रिलियन डॉलर्स आहे, तर जगाची लोकसंख्या 8.02 अब्ज डॉलर्स इतकी आहे. याचाच अर्थ जगातील प्रत्येक व्यक्तीवर 11 लाख रुपयाचं कर्ज आहे. बलाढ्य समजल्या जाणाऱ्या अमेरिकेवर सर्वाधिक कर्ज आहे. अमेरिकेनंतर चीन, जपान, युरोपीय देशांचासुद्धा या यादीत समावेश आहे. हिंदुस्थानचा या यादीत सातवा क्रमांक आहे. आयएमएफ अहवालानुसार, 2024 पर्यंत जगाचे वाढते कर्ज ही एक मोठी समस्या बनली आहे. अमेरिका आणि चीनच्या कर्जात मोठी वाढ होत आहे. जगाचे कर्ज जरी जागतिक जीडीपीपेक्षा कमी असले तरी हे कर्ज एकूण जीडीपीच्या 93 टक्क्यांवर पोहोचले आहे. जी अत्यंत धोकादायक पातळी समजली जात आहे. याशिवाय अनेक देशांच्या डोक्यावर त्यांच्या एकूण जीडीपीपेक्षा जास्त कर्ज आहे. कोणत्या देशावर किती कर्ज…
अमेरिका – 36.6 टक्के
चीन – 16.1 टक्के
जपान – 10 टक्के
इंग्लंड – 3.6 टक्के
फ्रान्स – 3.5 टक्के
इटली – 3.2 टक्के
हिंदुस्थान- 3.2 टक्के
जर्मनी – 2.9 टक्के
कॅनडा – 2.3 टक्के
ब्राझील – 1.9 टक्के
स्पेन – 1.7 टक्के
मेक्सिको – 1.0 टक्के
साऊथ कोरिया – 1.0 टक्के
ऑस्ट्रेलिया – 0.9 टक्के
रशिया – 0.4 टक्के
इजिप्त – 0.3 टक्के
थायलंड – 0.3 टक्के
साऊथ आफ्रिका – 0.3 टक्के
Comments are closed.