हिवाळ्यात वारंवार होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा, आरोग्य राहील मजबूत

ऑक्टोबर हिटनंतर राज्यात काहीशी थंडी जाणवू लागली आहे. मात्र वातावरणातील सततच्या बदलांमुळे राज्यभर कधी उष्मा तर कधी पाऊस अशी स्थिती निर्माण झाली आहे. थंडीचे दिवसात शरीराची अतिरिक्त काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. थंडीमुळे सर्वत्र साथीचे आजार पसरू लागतात. सर्दी, खोकला, ताप आदींमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ज्यामुळे थकवा, अशक्तपणा वाढतो. खूप थंडी पडल्यावर उबदार कपडे घातले जातात. पण शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी चहा नेहमीच घेतला जातो. पण वारंवार चहा पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसात शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत याबद्दल सविस्तर सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्य सुधारते.(छायाचित्र सौजन्य – istock)

व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे थकवा येतो का? मग आहारात या 'हिरव्या पानांचे सेवन करा, तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहाल

थंडीच्या दिवसात हे पदार्थ खा.

लसूण:

लसूण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. वर्षातील बाराही महिने आहारात लसणाचे सेवन करावे. लसणाचा वापर अन्न तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे अन्नाची चव आणि सुगंध वाढतो. डॉक्टरही थंडीच्या दिवसात कच्चा लसूण खाण्याचा सल्ला देतात. यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते, प्रतिकारशक्ती सुधारते, शरीराला संसर्गापासून संरक्षण मिळते आणि बद्धकोष्ठता कमी होते. तसेच आठवड्यातून एक किंवा दोनदा लसणाचा अर्क बनवून प्या.

गूळ

हिवाळ्यात गूळ खा. गूळ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. गूळ हे गरम अन्न आहे. सर्दी, खोकला अशा अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गुळाचे सेवन केले पाहिजे. साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा प्या. तसेच चिक्की, लाडू किंवा गुळापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.

सुकी फळे:

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ड्रायफ्रुट्स खायला आवडतात. काजू, बदाम, बेदाणे, अंजीर, पिस्ता इत्यादी खाल्ल्या जातात. यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते. व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम, तांबे, जस्त, कॅल्शियम आणि इतर अनेक आरोग्यदायी प्रथिने सुक्या मेव्यामध्ये आढळतात.

शरीरात पित्त वाढल्याने सतत आंबट ढेकर येणे? मग अशा प्रकारे आल्याचे सेवन करा, पचनाच्या समस्या दूर होतील

आले:

शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आले खा. सकाळी उठल्यावर आल्याचा रस रिकाम्या पोटी सेवन केल्याने आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर पडते आणि पचनक्रिया सुरळीत राहते. सर्दी, खोकला, घसादुखी, संसर्ग, ताप इत्यादीपासून आराम मिळण्यासाठी आले खावे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (संबंधित प्रश्न)

हिवाळ्यात कोणते पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे?

गूळ शरीराला उबदार करतो आणि तिळाच्या सेवनाने ऊर्जा मिळते. मेथीमध्ये लोह, फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. हिवाळ्यात मेथीचे पराठे, भजी किंवा मेथीचे लाडू खाणे फायदेशीर आहे.

हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणारे कोणते पदार्थ आहेत?

भाज्यांचे सूप शरीराला गरम करून पोषक तत्वे पुरवते. आले आणि लसूण दोन्ही सर्दी, खोकला आणि पचनाच्या तक्रारींवर चांगले आहेत. चहामध्ये आले मिसळणे खूप फायदेशीर आहे.

हिवाळ्यात भाज्या खाण्याचे काय फायदे आहेत?

हिवाळ्यातील भाज्यांमध्ये भरपूर पोषक, जीवनसत्त्वे (A, C, K), खनिजे आणि फायबर असतात. गाजर, बीट यांसारख्या भाज्यांमधील बीटा-कॅरोटीन आणि जीवनसत्त्वे त्वचेला निरोगी ठेवतात.

टीप – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी लिहिला आहे आणि कोणत्याही प्रकारचा इलाज असल्याचा दावा करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Comments are closed.